Travel Vlogger Calls Pondicherry Unsafe For Girls Viral Video : पॉण्डिचेरी म्हटल्यावर सर्वात आधी आठवतो तो समुद्र आणि समुद्रकिनारे. पॉण्डिचेरीची दुसरी ओळख म्हणजे फ्रेंच वसाहत. हे निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वारसा असलेले शहर पाहण्यासाठी अनेक पर्यटक भारताच्या काना-कोपऱ्यातून येथे येतात. भारतच नव्हे तर परदेशातूनही अनेक पर्यटक येथे येतात. आजकाल अनेक महिला पर्यटक देखील येथील आवर्जून भेट देतात. पण नुकसत्याच समोर आलेल्या एका ट्रॅव्हल व्लॉगरच्या व्हायरल व्हिडिओमुळे पॉण्डिचेरीमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे. लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या पॉण्डिचेरीतच्याभेटी दरम्यान एक महिलेला छेड काढल्याचा आणि पाठलाग करण्याचे त्रासदायक अनुभव आल्याचे तिने सांगितले. इन्स्टाग्राम हँडल ‘स्टार गर्ल’ द्वारे ओळखली जाणारी, ही व्लॉगर एका औषध कंपनीची राष्ट्रीय व्यवसाय प्रमुख आहे.

आता व्हायरल झालेल्या इन्स्टाग्राम रीलमध्ये, ‘स्टार गर्ल’ ने शेअर केले की, तिने कामानिमित्त २० पेक्षा जास्त वेळा पॉन्डिचेरीला भेट दिली आहे. तथापि, प्रत्येक वेळी जेव्हा ती समुद्रकिनाऱ्यांवर किंवा शहरातील रस्त्यांवर फिरण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला स्थानिक पुरुषांच्या त्रासदायक वर्तनाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे तिला नेहमी असुरक्षित वाटते.

“मुलींनो, तुम्ही तिथे(पॉण्डिचेरीमध्ये) मुक्तपणे फिरू शकत नाही,” असे ती व्हिडिओमध्ये सांगते. “स्थानिक मुले तुम्हाला चिडवतील. कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर जा, जर तुम्ही लहान कपडे परिधान केले असतील तर ते तुमच्याकडे विचित्रपणे पाहतील आणि तुम्ही त्यांच्याबरोबर रात्र घालवू शकता का असे विचारतील. हो, उघडपणे,” असेही तिने पुढे सांगितले.

एकाने तिचा पाठलाग केला अन्….

विशेषतः एका भयानक घटनेबाबत, तिने सांगितले की, समुद्रकिनाऱ्यावरून तिच्या हॉटेलपर्यंत एक पुरूष तिचा पाठलाग करत होता. तो तिच्याबरोबर तिच्या इमारतीच्या लिफ्टमध्येही घुसला. सुरक्षिततेच्या भीतीने तिने तिच्या मूळ मजल्यापर्यंत बटण दाबले नाही. त्याऐवजी, तिने दुसऱ्या मजल्यावर उतरली. तो तिच्या मागे येत होता तेव्हा त्याचा सामना केलाआणि इतरांना त्याच्या अनुचित वर्तनाबद्दल सांगण्याची धमकी दिली, ज्यामुळे तो पळून गेला.

दुसर्‍या एका घटनेत, ती आणि तिची बहीण स्कूटरवरून जात असताना एका पुरूषाने तिच्या बहिणीच्या मांडीला स्पर्श केल्याचे तिने सांगितले. या कृत्यामुळे त्या दोघीही हादरल्या आणि त्यांना याचा मानसिक धक्का बसला होता.

व्ह्लॉगरने स्पष्ट केले की तिचा हेतू पॉंडिचेरीचे पर्यटन किंवा प्रदेशाची प्रतिष्ठा खराब करण्याचा नव्हता तर सहकारी महिला प्रवाशांना सावध करण्याचा होता. तिने स्थानिक अधिकाऱ्यांना महिलांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलण्याचे आवाहनही केले.

व्हिडिओ ऑनलाइन वेगाने पसरल्यानंतर, तिने खुलासा केला की, पॉंडिचेरी पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधला. “त्यांनी खरोखरच माझ्याशी संपर्क साधला. मी त्यांना सर्व काही समजावून सांगितले आणि त्यांनी घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली,” ती म्हणाली.

या वर्षाच्या सुरुवातीला, पॉंडिचेरीमधील महिलांच्या सुरक्षेबद्दल अशाच प्रकारच्या चिंता व्यक्त करणारा आणखी एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे.

रीलमध्ये, कंटेंट क्रिएटर सोनी सलोनी यांनी हे शहर महिला प्रवाशांसाठी सर्वात असुरक्षित ठिकाणांपैकी एक म्हणून वर्णन केले. व्हिडिओमध्ये तिच्याबरोबर दिसणारी तिची मैत्रीण, तराना चौहान हिने याबाबत सहमती दर्शवली. आणि तिने हा अनुभव असुरक्षित आणि निराशाजनक असल्याचे म्हटले.

पॉंडिचेरी महिला सुरक्षा

२०१६ मध्ये, पॉंडिचेरीने “मित्रा” हे मोबाईल अॅप्लिकेशन लाँच केले. या अॅपचे प्राथमिक उद्दिष्ट “महिला सुरक्षा आणि रॅगिंग/छेडछाडीचा धोका आणि महिला आणि मुलींना येणाऱ्या इतर अडचणींना आळा घालणे” आहे, असे पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवर लिहिले आहे.