Viral Video: सोशल मीडियावर एखादा ट्रेंड सुरु झाला की, प्रत्येक व्यक्ती त्याला स्वतःच्या कलेत, स्वतःच्या स्टाईलमध्ये किंवा आवडीनुसार त्यांच्या रील व्हिडीओत सादर करते. तर सध्या इन्स्टाग्रामवर एक ट्रेंड सुरु आहे. हा ट्रेंड म्हणजे, या अभिनेत्याने किंवा या अभिनेत्रीने माझ्या फोटोवर, व्हिडीओवर कमेंट केली तर, मी अभ्यास करायला सुरवात करेन, मी व्यायामशाळेत जाण्यास सुरुवात करेन… तर असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तरुणाने सादर केलेली कला पाहून बॉलिवूड अभिनेताही कमेंट करण्यापासून स्वतःला थांबवू शकला नाही आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओत :

एका तरुणाने एकाच वेळी अभिनेता रणवीर सिंगच्या अनेक रेखाचित्रे तयार केली आहेत. त्याने मोठ्या पट्टीला अनेक पेन्सिल जोडल्या आहेत व याचा वापर करून तो रणवीर सिंगची रेखाचित्रे रेखाटतो आहे. तरुणाने रेखाटलेली रेखाचित्रे बॉलीवूड चित्रपटांमधील त्याने साकारलेली १० उत्कृष्ट पात्र आहेत. एकदा पाहाच तरुणाने साकारलेली ही सुंदर रेखाचित्रे.

हेही वाचा…फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग घेतायत जपानी मास्टरकडून तलवार बनविण्याचे धडे; पाहा व्हायरल VIDEO

व्हिडीओ नक्की बघा :

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुण रणवीर सिंगच्या १० चित्रपटांमधील पात्र रेखाटताना दिसत आहे. या पात्रांमध्ये पद्मावती, सिम्बा, 83, गुंडे, गली बॉय, बाजीराव मस्तानी अश्या एकूण दहा चित्रपटांचा समावेश आहे. पौमिल खत्री असे या तरुणाचे नाव असून त्याने त्याने याआधी सुद्धा विविध कलाकारांचे अशी रेखाचित्रे रेखाटलेली तुम्हाला त्याच्या अकाउंटवरून दिसून येतील.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @paulsartgallery98 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला “जर रणवीर सिंगने माझ्या व्हिडीओवर कमेंट केली तरचं मी माझी कला सादर करण्याचे काम सुरु ठेवेन” ; अशी कॅप्शन लिहिली होती. तर या तरुणाचे कौशल्य पाहून बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने सुद्धा व्हिडीओखाली तरुणाचे कौतुक करत कमेंट केली आहे आणि सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांच लक्ष वेधून घेतलं आहे.