जगप्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यामुळे आज आपण घरबसल्या एकमेकांशी जोडलेले आहोत आणि व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया ॲप्सवर हवा तेवढा संवाद साधून वेळ व्यतीत करतो आहोत. मार्क झुकरबर्ग हे सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असतात आणि नेटकऱ्यांबरोबर अनेक गोष्टी शेअर करीत असतात. आजही मार्क झुकरबर्ग यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. काय आहे या पोस्टमध्ये खास; चला पाहू.

कामाबरोबरच सुटीचाही आनंद घेणारे मार्क झुकरबर्ग नवनवीन गोष्टींचा अनुभव घेत असतात. नुकतेच त्यांनी कटाना ही जपानी तलवार कशी बनवायची याचे प्रशिक्षण घेतले आहे. यादरम्यान त्यांनी तलवार बनविणाऱ्या अकिहिरा या प्रशिक्षकाबरोबर (मास्टर) फोटो, प्रशिक्षण घेतानाचा व्हिडीओ आणि स्वतः बनविलेल्या तलवारीचा एक फोटोसुद्धा शेअर केला. एकदा पाहाच ही पोस्ट.

LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती
IPL 2024, PBKS vs DC Today's Match Updates
“ऋषभ पंत आज घाबरलेला असेल आणि..”, दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पॉंटिंग स्वतः म्हणाले, “नेटमधून बाहेर..
women Forcefully married with travels businessman and stolen 17 lakhs
‘लुटेरी दुल्हन!’ ट्रॅव्हल्स व्यापाऱ्याशी बळजबरी लग्न, १७ लाख उकळले

हेही वाचा…‘शृंगार करून नटलेली मराठी भाषा…’ मुंबई पोलिसांनी ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या दिल्या अनोख्या शुभेच्छा; पाहा पोस्ट

पोस्ट नक्की बघा…

पोस्टमध्ये तुम्ही पाहिले असेल की, तयार झालेल्या तलवारीचा प्रयोगदेखील ते करून पाहत आहेत. प्रशिक्षण घेताना त्यांनी काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत लिहिले, “आज दुपारी मास्टर अकिहिरा यांच्याकडून कटाना (तलवार) बनविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. तुमची कला आम्हाला शिकवल्याबद्दल धन्यवाद”, अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट मार्क झुकरबर्ग यांच्या @zuck या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच नेटकरी ही पोस्ट पाहून मार्क झुकरबर्ग यांना, “तुम्ही निंजा बनण्याची ट्रेनिंग घेत आहात का?”, “ही तलवार बनवायला किती वेळ लागला?”, असे विविध प्रश्न विचारत आहेत; तर काही जण कमेंटमध्ये मार्क झुकरबर्ग यांच्या या नवीन कौशल्याचे कौतुक करताना दिसून आले आहेत.