आजकाल अनेकजण गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या नात्यामध्ये असतात पण नात्याला पुढे नेण्यासाठी दोघांपैकी एकजण एकमेकांना लग्नाची मागणी घालतात. आपल्या लग्नाचे प्रपोजल अत्यंत खास असावे असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. त्यामुळे गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड आपल्या जोडीदारासाठी काहीतरी खास सरप्राईज प्लॅन करतात. कधी निसर्गरम्य ठिकाणी घेऊन जातात, कधी चित्रपट पाहायला घेऊन जातात, कधी साहसी खेळ खेळण्यासाठी घेऊन जातात आणि जोडीदाराला अपेक्षा नसताना प्रपोज करतात. हा क्षण त्या दोघांसाठी अत्यंत खास असतो. हे प्रपोजल नीट पार पडावे यासाठी खूप प्लॅनिंग करतात आणि कोणतीही गडबड होऊ याची काळजी घेतात पण ऐनवेळी नेमकी काही ना काही गोंधळ होतो. असाच काहीसा प्रकार एका जोडप्याबरोबर घडला. आपल्या गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घालण्यासाठी एका उंच धबधब्यावर एक तरुण घेऊन गेला पण प्रपोज करण्यापूर्वीच असे काही घडले ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

एक तरुण लग्नाची मागणी घालण्यासाठी गर्लफ्रेंडला एका उंच धबधब्याजवळ घेऊन जातो पण प्रपोज करण्यापूर्वीच त्याच्या हातातील अंगठी धबधब्यात पडते. हे पाहून गर्लफ्रेंडला धक्काच बसतो त्यानंतर पुढे जे घडते त्याची कोणीही कल्पनाही केली नसेल. नक्की काय घडले ते जाणून घ्या.

व्हिडीओच्या सुरुवातीला दिसते की एक तरुण तरुणी एका उंच धबधब्याच्या समोर उभे आहे. अचानक तरुण तरुणीसमोर गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करणार असतो. हे पाहून तरुणीच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून येतो. पण पुढच्याक्षणी त्याचा तोल जातो अन् त्याच्या हातातील अंगठीचा डब्बा खाली धबधब्यात पडतो. जे काही घडले ते पाहून त्या तरुणीला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आणि ती थक्क होऊन पाहात राहते. त्यानंतर ती दोन पाऊले पुढे जाऊन धबधब्याकडे पाहात राहते. तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण खराब झाला आणि तिच्या प्रियकराने आणलेली मौल्यवान अंगठी पाण्यात पडली हे पाहून तिला धक्का बसलेला असतो पण हा व्हिडिओ येथेच संपत नाही. खरी मज्जा तर या पुढे सुरु होते. तरुणी गोंधळलेल्या अवस्थेत असताना तो तिच्या मागे जाऊन पुन्हा गुडघ्यावर बसतो आणि पुन्हा अंगठी देऊन तिला प्रपोज करतो. हे पाहून तरुणीला काहीक्षण विश्वासच बसत नाही. तिच्याबरोबर मस्करी केली जात आहे हे तिच्या लक्षात येत नाही. ज्या क्षणी तिला लक्षात येते की ही सगळी मस्करी होती आणि तिच्या बॉयफ्रेंडने तिला खरोखर प्रोपज केले आहे त्यानंतर तिला खूप आनंद होतो. दोघंही हा क्षण आनंदाने एन्जॉय करतात. हा सर्व प्रकार तिचे मित्र-मैत्रिणी कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत आहेत.

अंगठी पडल्यानंतर काहीवेळ घबराट पसरली असली तरी ती एक विनोदी घटना आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना दिलासा मिळाला आणि त्यांचे मनोरंजनही झाले. ही घटना लवकरच व्हायरल झाली आणि सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या.

ते नियोजित असो किंवा आनंदी अपघात असो,नेटकऱ्यांना हा व्हिडिओ प्रंचड आवडला आहे.

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या:

एका वापरकर्त्याने लिहिले: “याच्याशी लग्न केल्याने तुम्ही जिवंत राहाल.”

दुसऱ्याने म्हटले: “मला भीती वाटत होती की तीही पडते की काय.”

तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले: “हे मजेदार नाही… ती बॉक्स पकडण्याच्या प्रयत्नात पडू शकली असती.”

चौथ्या वापरकर्त्याने म्हटले: “हे धोकादायक आहे.”