Navi mumbai viral video: “अज्ञात लोकांशी बोलताना सावध राहा”, असा सल्ला घरातील जेष्ठ मंडळी अनेकदा देतात. कारण कोण कुठल्या इराद्यानं तुमच्याशी संपर्क साधेल सांगता येत नाही. तुम्ही एखाद्याला मदत करायला जाल अन् स्वत: संकटात अडकाल. अशी कितीतरी प्रकरण आजवर घडली आहेत. अन् या यादीत आता आणखी एका नव्या घटनेची भर पडली आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथे एक धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. यामध्ये एका साधूच्या वेशात आलेल्या व्यक्तीनं एका तरुणाला क्षणात लूटलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.हा व्हिडीओ पाहा, अन् तुम्ही देखील सावधान आणि सतर्क राहा.

हिप्नोटाईज करुन लुटमार करण्याच्या अनेक घटना तुम्ही आजपर्यंत ऐकल्या असतील. होय, असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका भामट्याला पाहू शकता. ज्यानं अवघ्या काही सेकंदात मोहिनी घालून समोरच्या व्यक्तीला लुटलं. अशा प्रकारच्या घटनांमुळे लोकं आता एकमेकांना मदत करायला सुद्धा घाबरतात. आश्चर्याची बाब म्हणजे ही चोरी फक्त २ मिनिटांत झालीये, ते देखील रस्त्यावर सगळ्यांसमोर. या चोरीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणाला या साधूंनी थांबवलं आणि काहीतरी त्याच्याशी बोलू लागले. यानंतर त्यांनी थेट तरुणाच्या खिशात हात घातला आणि पैसे काढले. यावेळी सुरुवातीला तरुणानं विरोध केला मात्र या साधूंनी त्याला बरोबर आपल्या बोलण्यात फसवलं त्याच्या हातात काहीतरी ठेवलं आणि पैसे घेऊन निघून गेले. हा व्हिडीओ तुम्ही देखील पाहा, अन् सांगा काय वाटतं तुम्हाला? या प्रकरणातील गुन्हेगारांना कुठली शिक्षा केली पाहिजे?

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ रस्त्यावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लाखो नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतेय, ही टेकनिक राजकीय नेत्यांवर वापरली पाहिजे, तर कोणी म्हणतेय, अज्ञात लोकांशी बोलताना सावध राहिलं पाहिजे. असो, या प्रकरणी तुमचं मत काय आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.