आजच्या काळात अनेकांना फोनचं व्यसन लागलं आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांना फोन हवा असतो. यावरच आपलं जीवन अवलंबून आहे असं अनेकांना वाटत असतं. या नादात अनेकदा दुर्घटना होतात, वाईट परिस्थिती ओढावते तर काहींना जीवालाही मुकाव लागतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कामापुरता फोन वापरणं वेगळं आणि फोनचं व्यसन लागणं वेगळं. ज्यांना फोनचं व्यसन लागतं त्यांना आजूबाजूला नेमकं काय घडतंय हेदेखील कळत नाही. ते आपल्याच दुनियेत मग्न असतात. त्यांना जगाची जणू पर्वाच नसते. पण यासगळ्यात आपल्यासोबतच दुसऱ्याला तर त्रास होत नाही आहे ना हेदेखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत फोन वापरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवल्याचं दिसतंय.

रस्ता ओलांडताना फोन वापरणं पडलं भारी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरुण रस्ता ओलांडताना फोनममध्ये मग्न आहे. वरदरळीच्या या रस्त्यावर आजूबाजूला न पाहता, गाड्यांची गर्दी न पाहता फोनमध्ये बघत हा मुलगा रस्ता ओलांडताना दिसतोय. तसंच फोनवर बघून रस्ता ओलांडत असताना अचानक तो, एका पोलिसांच्या बाईकसमोर येतो आणि तेवढ्यात बाईकवर असणारा पोलिस त्या तरुणाच्या जोरात कानाखालीच मारतो.

कानाखाली मारताच तरुण खाली बसतो, इतक्या जोरात त्याला खाकीचा दणका बसलेला असतो.

व्हिडीओची लिंक

https://www.instagram.com/punerispeaks/reel/DE1EUdmqCqq/

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो @punerispeaks या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “मोबाईलमध्ये पाहत रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाच्या पोलिसाने कानशिलात लगावली” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसंच “यात कोण बरोबर आणि चूक कोणाची….?” असाही प्रश्न नेटकऱ्यांना विचारला गेला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला ३ लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “पोलिसाने हेल्मेट घातलं नाही, मग पावती फाडणार का?” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “गाडीवरून उतरून अजून दोन द्यायला पाहिजे होत्या” तर एकाने “अगदी बरोबर केलं” अशी कमेंट केली. “पोराची चूक आहेच पण पोरगा गाडी चालवत असता तर हेल्मेट नाही म्हणून त्याला मारलं असतं.. पोलिसांचं हेल्मेट कुठेय? वर्दीची हवा” अशीदेखील कमेंट एकाने केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man using mobile phone while road crossing police slapped him shocking video viral on social media dvr