Manali snowfall shocking video: हिमाचल प्रदेशात काही काळ बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी बर्फवृष्टी ही शिक्षा ठरली. सोमवारी रात्री अटल बोगद्याजवळ १००० वाहने अडकली. लेह मनाली राष्ट्रीय महामार्गावर अटल बोगद्यापासून मनालीच्या सोलांग नाल्यापर्यंत बर्फवृष्टी झाली आणि त्यामुळे निसरडापणा इतका वाढला की, बोगद्याजवळ वाहने थांबवावी लागली.नाताळ, नववर्षाच्या निमित्ताने असंख्य पर्यटक मनालीला पोहोचलो. फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळे तेथे गर्दी झाली. त्यात बर्फवृष्टी वाढल्याने अधिक गोंधळ झाला. वातावरणात गारवा वाढल्याने रस्ते कोरडे झाले. परिणामी वाहतूकीवर मोठा परिणाम झाला. याच ठिकाणचा एक थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून एक गाडी कोसळतानाचा भीषण LIVE व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामुळे तुम्ही देखील पर्यटनासाठी हिमाचलमधील कुल्लू मनाली, शिमला याठिकाणांना भेट देणार असाल तर आधी हे धडकी भरवणारे व्हिडीओज एकदा पाहाच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पर्यटकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

हिमाचलमधील शिमला, मनालीसह अनेक ठिकाणी हवामान खूपच खराब होत असल्याची स्थिती आहे. याठिकाणी जोरदार बर्फवृष्टी आणि पाऊसामुळे पर्यटक ठिकठिकाणी अडकून बसले आहेत. रस्त्यावर बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावरुन वाहनांना पुढे जाणेही शक्यत होत नाहियेय. बर्फामुळे रस्ते निसरडे झाल्याने वाहन घसरुन सरळ समोरच्या वाहनांना जाऊन धडक देताना दिसतायत. त्यामुळे वाहनांमधील पर्यटकांना तिथे जीव मुठीत घेऊन प्रवास करतावा लागतोय.

सध्या समोर आलेला व्हिडीओ तर धडकी भरवणारा आहे. कारण बर्फाळ रस्त्यामुळे ब्रेक निकामी झाल्याने ट्रकचे नियंत्रण सुटले आणि चालकाने तात्काळ वाहनातून उडी मारली. त्याने गाडी थांबवण्याचा प्रयत्नही केला, पण सर्व निष्फळ. दरम्यान पुढच्याच क्षणी अवघ्या ७ सेकंदात ट्रक दरीत कोसळला. हिमाचल प्रदेशमध्ये लाहौल-स्पिती, चंबा, कांगडा, कुल्लू, शिमला आणि किन्नौरसह सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी झाली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लढाई अस्तित्वाची! एका माशासाठी अवकाशात रंगले थरारक युद्ध; घारीने मारली चोच तर बगळ्याचा पलटवार, पाहा शेवटी कोणी मारली बाजी?

मनालीमध्ये साधारण दोन आठवड्यांपूर्वी हिमवर्षावाला सुरुवात झाली. त्यानंतर सोमवारी तेथे तुफान बर्फवृष्टी झाली. फिरायला आलेले प्रवासी ठिकठिकाणी अडकले. त्यातही सोलांग, अटल बोगदा येथे हजाराहून अधिक वाहने अडकून पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. या परिस्थितीमध्ये पोलिसांनी धाडस करत ७०० पर्यटकांना सुरक्षितस्थळी नेले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manali snowfall shocking video narrow escape driver jumps out as truck skids on snowy road in manali falls into solang valley srk