Viral Video Rapido Driver Arrives Drunk : ओला, उबर या खासगी टॅक्सी सेवेबरोबर रॅपिडोच्या बाइक टॅक्सी सेवेचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. अनेक लोक कामावर जाताना किंवा कामावरुन घरी येताना किंवा उशीर झाला असेल तर रॅपिडो बाइकचा आधार घेतात. पण, अनेकदा या बाईक सेवेचा उपयोग करताना प्रचंड वाईट अनुभव काही ग्राहकांना आले आहेत. एका मुलीने प्रवासा दरम्यान तिचा अपघात रेकॉर्ड केला होता. पण, आज तर हद्दच पार झाली आहे. बाईक चालक मद्यधुंद अवस्थेत ग्राहकाला घेण्यासाठी आला आहे.

मुंबईतील एका माणसाला चिंताजनक परिस्थितीचा सामना करावा लागला. त्या व्यक्तीने रॅपीडो बाईक राईड बुक केली होती. पण, त्याला घेण्यासाठी आलेला ड्रायव्हर दारू पिऊन असल्याचे आढळले. अशा परिस्थितीत बहुतेक लोक ताबडतोब राईड रद्द करू टाकतात . पण, त्या माणसाने वेगळा मार्ग निवडला. त्याने स्वतः दुचाकी चालवण्याचे ठरवले आणि नियुक्त केलेला ड्रायव्हर त्याच्या मागे बसला आहे.

स्वतःलाच घरी सोडावे लागेल (Viral Video)

ही घटना मध्यरात्री ४ ऑगस्ट रोजी १२ वाजून ५७ मिनिटांच्या सुमारास घडली. रॅपिडो, कंपनीतील सर्व कर्मचारीही मद्यधुंद अवस्थेत असतात. किती बेजबाबदार कंपनी आहे, एसओएस लाईनला कॉल करूनही त्या ग्राहकाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याला पुढे बसून स्वतःलाच घरी सोडावे लागेल. तुम्ही लोकांच आयुष्य धोक्यात घालत आहात; असे त्याने कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्या ग्राहकाने हे देखील अधोरेखित केले की, सहा दिवस उलटूनही, कोणीही त्याच्या तक्रारीची दखल घेतली नाही. पण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने कमेंट केली आहे की, “आम्ही त्या ड्रायव्हरवर कठोर कारवाई केली आहे”, त्याचबरोबर अनेक युजर्स त्यांचे रॅपिड बाईक राईड दरम्यानचे धक्कादायक अनुभव सांगताना दिसत आहेत “रॅपिडो ड्रायव्हरने मला रस्त्याच्या मधोमध सोडले. मी कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, काहीच प्रतिसाद मिळाला नाही” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.