Crows Riding On Mumbai Bus : धावत्या मुंबई शहरात माणसांबरोबर प्राण्यांचीही आपलीच लगबग सुरू असते. घरटे बांधण्यासाठी, पिल्लांना अन्न देण्यासाठी त्यांची दररोज धडपड सुरू असते. तसेच मुंबई शहरात छोटे-मोठे थवे करून राहणाऱ्या कावळ्यांंची संख्या भरपूर आहे. या कावळ्यांचे दिसणे असो वा ओरडणे असो, कुठला ना कुठला संदेश देत असतात अशी समज रूढ आहे. पण, आज मुंबईचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये कावळ्यांचे वेगळे रूप पाहायला मिळाले आहे. काही कावळे धावत्या बसवरून प्रवास करताना दिसले आहेत.

व्हायरल व्हिडीओ मुंबईचा आहे. अनेक वाहनांच्या मध्ये एका बेस्ट बसने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण या बसवर काही कावळे जणू काही प्रवास करताना दिसले आहेत. बहुदा आकाशात झेप घेताना कावळ्यांनी या बेस्ट बसची लिफ्ट घेण्याचे ठरवले. तुम्ही पाहू शकता की, बेस्ट बसच्या छतावर १० हून अधिक कावळे प्रवास करताना दिसत आहेत. पण, हा व्हिडीओ नेटकऱ्यांना एका लोकप्रिय चित्रपटाची आठवण करून देतो आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहा आणि तुम्हाला कोणत्या चित्रपटाची आठवण आली ते सांगा.

हेही वाचा…VIDEO: दागिने घातले, हाराने सजवले अन् केकऐवजी ठेवलं हे समोर; सोंड हलवत धन्यवाद म्हणणाऱ्या ‘हत्ती अखिला’च्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन पाहा

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत कावळ्यांचा ग्रुप बसच्या छतावर प्रवास करत आहे, हे पाहून एका प्रवाशाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. पण, हा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी मात्र मिम्स आणि कमेंटचा वर्षाव या व्हिडीओवर केला आहे. कारण हा व्हिडीओ तमिळ चित्रपटातील प्रभूदेवाचं गाजलेलं गाणं ‘उर्वशी.. उर्वशी’च्या एका दृश्याची आठवण करून देतो आहे, ज्यात कावळ्यांऐवजी पुरुषांचा ग्रुप डान्स करत होता. यामुळे अनेक मिम्सदेखील यावर बनवले गेले, जे सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.

कावळे निघाले मुंबई दर्शनाला :

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @krownnist या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कावळ्यांना बसच्या छतावर प्रवास करताना पाहून नेटकरी अनेक मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘कावळे मुंबई दर्शनाला निघाले आहेत.’ तर दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे की, ‘कावळे उर्वशी.. उर्वशी गाण्यावर नाचत आहेत’, तर तिसऱ्याने कमेंट केली की, ‘जेव्हा तुम्ही पॉवर सेव्हिंग मोड ॲक्टिव्हेट करता’, तर काही जण ‘कावळेदेखील सार्वजनिक वाहतुकीचा आनंद लुटताना दिसत आहेत’ आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.