नवरात्र उत्सव हा देवी दुर्गाच्या नऊ रूपांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. श्त्रीशक्तीला हा उत्सव समर्पित केला गेल्याने वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि दैवी शक्तीचे हा सण प्रतीक आहे. ‘नव’ म्हणजे नऊ आणि ‘रात्री’ म्हणजे रात्र या नऊ रात्रींमध्ये भक्त दुर्गा देवीच्या विविध रुपांची पूजा करतात. अशातच नवरात्री निमित्त काही हौशी महिलांनी भंडारा उधळत जबरदस्त असा डान्स केल आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर कायम अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी चिमुकल्यांचे शाळेतील डान्स तर कोणाचा लग्नाच्या वरातीमधील डान्स. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या सोशल मीडियावर काही महिलांच्या एका ग्रुपचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. दरम्यान अशाच काही हौशी महिलांचा गृप डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या महिलांनी चाळीतल्या छोट्याशा जागेत भन्नाट डान्स केला आहे जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चार महिला पांढऱ्या रंगाची साडी नेसून कपाळावर भंडारा लावून आई अंबे जगदंबे या मराठी गाण्यावर डान्स करत आहेत. देवीला साद घालावी अशी साद या महिला त्यांच्या नृत्यातून घालत आहेत. संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

mansi.gawande.73 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.