अंकिता देशकर

Naxal Attack In Dantewada: दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात २७ एप्रिल रोजी १० पोलिस कर्मचारी आणि एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचा दावा करणारे काही फोटो इंडियन एक्स्प्रेसला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर आढळले. याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर अंकित साहूने व्हायरल फोटो शेअर केले आहे. यात ११ भारतीय जवान शहीद झाल्याचे कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.

तपास:

आम्ही प्रत्येक फोटोला तपासण्यापासून या फॅक्ट चेक ची सुरुवात केली.

फोटो १:

आम्ही गूगल रिव्हर्स इमेज चा वापर करून पहिला फोटो शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला हे चित्र outlookindia.com वर सापडले.

https://www.outlookindia.com/website/story/india-news-chhattisgarh-cop-injured-in-ied-blast-by-naxals-in-dantewada/406091

कॅप्शन मध्ये लिहले होते: छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी नक्षलवाद्यांनी IED प्लांट केला. (फाइल फोटो-प्रतिनिधित्वात्मक प्रतिमा) AP. यातून आता हे स्पष्ट होते की हा फोटो जुना आहे आणि AP एजेन्सीचा आहे. आम्ही अससोसिएटेड प्रेस म्हणजेच AP च्या साईट वर हा फोटो शोधला.

आम्हाला कळले कि हा फोटो २७ ऑगस्ट २०१३ चा असल्याचे लक्षात आले. कॅप्शन मध्ये इंग्रजीत लिहले होते: मंगळवार, २७ ऑगस्ट २०१३ ला भारताच्या ओडिशा राज्यातील कोरापुट जिल्ह्यात माओवादी बंडखोरांनी गस्तीवर हल्ला केल्यानंतर भारतीय निमलष्करी सैनिक त्यांच्या खराब झालेल्या वाहनाजवळ उभे आहेत.

https://newsroom.ap.org/editorial-photos-videos/search?query=odisha%20maoist&mediaType=photo&st=keyword

फोटो २:

आम्ही परत गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर करून फोटो शोधण्यास सुरुवात केली.

आम्हाला हा फोटो ANI च्या एका ट्विट मध्ये दिला. कॅप्शन मध्ये लिहले होते: #UPDATE महाराष्ट्र: गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात 10 सुरक्षा कर्मचारी जखमी. 16 सुरक्षा कर्मचार्‍यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला.

हा फोटो १ मे २०१९ चा आहे/

फोटो ३:

आम्हाला हे चित्र Times of India च्या वेबसाईट वर सापडले. कॅप्शन मध्ये म्हंटले होते: छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या IED स्फोटानंतर CISF मिनीबसचे अवशेष. (PTI फोटो). हा लेख ११ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकाशित झाला होता.

https://timesofindia.indiatimes.com/city/raipur/one-bsf-jawan-killed-in-ied-blast-a-maoist-gunned-down-in-bastar/articleshow/66576154.cms

फोटो ४:

आम्ही चौथ्या फोटोवर देखील गूगल रिव्हर्स इमेज सर्चचा वापर केला.

हा फोटो ANI ने १३ मे २०१८ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये सापडला. कॅप्शन मध्ये लिहले होते: #छत्तीसगढच्या सुकमा येथील किस्टाराम भागात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटाच्या ठिकाणचे स्पॉट व्हिज्युअल, 9 CRPF जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हे ही वाचा<< वंदे भारत एक्सप्रेसच्या छताला गळती? लोको पायलट छत्री धरून ट्रेन चालवतानाचा Video पाहून बसेल धक्का पण…

निष्कर्ष: २७ एप्रिल रोजी झालेल्या छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्यात १० जवान शहीद झाल्याची बातमी ही सध्या विविध नक्षलवादी हल्ल्यांचे जुने व्हायरल फोटो दाखवून चुकीच्या पद्धतीने व्हायरल होत आहे.