Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. पूर्वी सोशल मीडियावर पुणेरी पाट्यांची खूप चर्चा असायची. त्यावरील विनोदी आशय नेहमी व्हायरल व्हायचे. परंतु, अलीकडे शाळेतील मुलांच्या पेपरातील उत्तरं, गाड्यांच्या मागचे हटके डायलॉगही तितकेच चर्चेत असतात. अशातच आता एका जाहिरातीचा फोटो समोर आला आहे; जो पाहून तुम्हीदेखील पोट धरून हसाल.

आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक जाहिरातींचे फोटो व्हायरल झाले आहेत; ज्यात लोक नेहमी अतरंगी पद्धतीने जाहिरात करताना दिसतात. नुकतीच काही दिवसांपूर्वी एका मुलाने चक्क स्वतःच्या लग्नासाठी एक जाहिरात दिली होती; ज्याचे रस्त्यावर फोटोदेखील लावण्यात आले होते. या फोटोची खूप चर्चा रंगली होती. अशातच आता एका क्लासच्या जाहिरातीचा फोटो व्हायरल होतोय; जो पाहून युजर्सही हसत आहेत.

या व्हायरल फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कोचिंग क्लासच्या जाहिरातीमध्ये सर्वांत आधी “यशस्वी भविष्यासाठी, विद्यार्थ्यांची तयारी… कोचिंग क्लासेस. शिकणे, अनुभव आणि आत्मविश्वास” असं लिहिण्यात आलं आहे. त्यानंतर खाली क्लासची फी केवळ १९९ रुपये, असं लिहिलेलं असून, हा क्लास पहिली ते दहावी आणि अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असल्याचं लिहिलेलं आहे. पण, या जाहिरातीच्या सर्वांत खाली एक महत्त्वाचं वाक्य लिहिण्यात आलंय; जे पाहून तुमचंही लक्ष वेधलं जाईल. त्यामध्ये “ओंकारसरांनी शिकवणे म्हणजे गजनीच्यापण लक्षात राहणे”, हे विनोदी वाक्य लिहिण्यात आलं आहे. त्याशिवाय खाली आमिर खानचा गजनी या चित्रपटातील फोटोदेखील दिसत आहे.

हेही वाचा: माणुसकीचा अंत! झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावरून नेली गाडी अन् पुढे जे घडलं… Viral Video पाहून नेटकरी संतप्त

पाहा फोटो:

हा व्हायरल फोटो इन्स्टाग्रामवरील @ag_creation_004 या अकाउन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ही व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तीनं, याला बोलतात जाहिरात करणं, असं या पोस्टवर लिहिलं आहे. त्याशिवाय यावर कमेंट्समध्ये युजरनं लिहिलंय, “अरे वा.. जाहिरात असावी तर अशी”. असं लिहिलं आहे. अनेक जण या फोटोवर हसण्याच्या इमोजी टाकत आहेत.

दरम्यान, यापूर्वीदेखील लग्नपत्रिकेचा एक फोटो व्हायरल झाला होता; ज्यात लग्नात कृपया दारू पिऊ नका. असा मेसेज लिहिण्यात आला होता. ही हटके पत्रिका सोशल मीडियावर खूप चर्चेत आली होती. त्याशिवाय याआधी एका मुलाचा शाळेतील पेपरचा फोटोदेखील व्हायरल झाला होता.