How Many Triangles Puzzle: मेंदूला चालना देणारी कोडी ही मेंदूला धार लावण्याचा, वेगळं विचार करायला भाग पाडण्याचा आणि त्याच वेळी मनोरंजन करण्याचा जुना आणि हिट मार्ग आहे. अशाच एका भन्नाट कोड्याने सध्या फेसबुकवर धुमाकूळ घातला आहे. एका साध्यासरळ दिसणाऱ्या आकृतीत किती त्रिकोण असू शकतात, असा प्रश्न तुम्ही कधी विचारलाय का? फेसबुकवर सध्या एक फोटो लोकांना डोकं खाजवायला लावत आहे. पहिल्या नजरेत तो अगदी सोपा दिसतो – एक आयत, त्यात काही उभ्या रेषा आणि वरच्या डावीकडून खालच्या उजवीकडे जाणारी एक तिरपी रेषा. पण, खरी गंमत तिथेच सुरू होते. हा फोटो पाहून तुम्हाला फक्त दोन-चार त्रिकोण दिसतील, पण हळूहळू लक्ष गेलं की डोळे मोठ्ठे होतील, कारण जितकं खोल बघाल, तितके नवे त्रिकोण दिसत राहतील. लहान, मोठे, एकत्र मिळून तयार झालेले आणि शेवटी संपूर्ण आकृतीला व्यापणारा एक भला मोठा त्रिकोण.
फेसबुक युजर अर्शदीप सोनी यांनी शेअर केलेल्या या आव्हानात एक आयताकार आकृती आहे. ती उभी विभागली आहे आणि वरच्या डाव्या कोपऱ्यातून खालच्या उजव्या कोपऱ्यापर्यंत एक तिरपी रेषा आहे. पहिल्या नजरेत बघायला अगदी सोपं वाटतं, पण खरी मजा पुढे आहे – यात तुम्हाला सर्व शक्य असलेले त्रिकोण मोजायचे आहेत. फक्त प्रत्येक छोट्या विभागात दिसणारे त्रिकोण नाही, तर अनेक विभाग जोडून तयार होणारे मोठे त्रिकोण आणि अगदी पूर्ण विकर्णरेषेने बनणारा सर्वात मोठा त्रिकोणसुद्धा गृहीत धरायचा आहे. तर मग तुम्ही तयार आहात का या मेंदूला खुराक देणाऱ्या कोड्याला भिडायला? लक्षात ठेवा – पहिल्या नजरेत जे दिसतं, तेच खरं असतं असं नाही…
पोस्टवरच्या फोटोवर साधा प्रश्न लिहिलेला आहे – “किती त्रिकोण?”
हे कोडं इतकं भन्नाट आहे की शेकडो लोकांनी कमेंट्समध्ये आपापले अंदाज दिले, पण अजूनही बरोबर उत्तरावर सगळ्यांचं एकमत झालेलं नाही. जणू काही हा फोटो डोक्याला सापळा लावतोय – तुम्ही जितकं विचाराल तितकं गुंतत जाल. एकाने लिहिलं, “त्रिकोणाला तीन कोपरे असतात, म्हणून माझं उत्तर १० आहे.” तर दुसऱ्याने ठामपणे सांगितलं, “फक्त ३ आहेत, कारण ४ भुजांच्या आकृती त्रिकोण नसतात.”
काहींनी सांगितलं, “दोन छोटे, दोन मोठे! थांबा, मीच गोंधळलोय.” तर कोणीतरी मजेत लिहिलं, “मला सगळे दिसतायत. यात चूक होण्याचा प्रश्नच नाही.” आणखी एकाने वेगळी मोजणी सांगितली, “दोन – एक वर डावीकडे आणि एक खाली उजवीकडे.”
शेकडो कमेंट्स आल्या, पण गंमत म्हणजे, एकाही उत्तरावर सर्वांचे एकमत नाही! काही जणांनी हिशोब लावून उत्तर दिलं, तर काहींनी अंदाज बांधला. आणि तरीही, बरोबर संख्या काय आहे यावरील पडदा नाही उघडला. तर प्रश्न अजून तसाच आहे –
तुम्हाला किती त्रिकोण दिसतायत? खाली दिलेली लिंक ओपन करुन पाहा चित्र
https://www.facebook.com/arshsoni/posts/1259540845861841?ref=embed_post
काळजीपूर्वक बघा, कारण उत्तर दिसतंय त्यापेक्षा जास्त क्लिष्ट आहे…