Optical Illusion Hidden Lizard: सोशल मीडियावर नेहमीच डोळ्यांची कसोटी पाहणाऱ्या ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) फोटोंची धमाल असते. असे फोटो म्हणजे केवळ करमणूक नाही, तर आपल्या निरीक्षणशक्तीला खरंच आव्हान देतात. नुकताच असा एक भन्नाट फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यात एक साधा झाडाचा बुंधा (मुळांच्या वरचा आणि फांद्यांच्या खालील भाग) दिसतो. पहिल्या नजरेत ते अगदीच ओसाड जंगलातील जुने झाड वाटेल. पण, जरा बारकाईने पाहिलंत तर तुमच्या अंगावर काटा उभा राहील, कारण त्या खडबडीत झाडाच्या बुंध्यावर लपलेला आहे एक जीव ‘मायावी सरडा!’

पहिल्याच नजरेत तुम्हाला ही साधी झाडाची साल वाटेल… पण, डोळ्यांची धार खरी तरबेज असेल तरच उलगडेल या फोटोत लपलेलं गुपित! इंटरनेटवर गाजणाऱ्या या मायावी चित्राने नेटकऱ्यांचे डोके गरगरले आहे. लाखो लोकांनी शोधायचा प्रयत्न केला, पण नजरेसमोर असूनही कुणालाच लगेच दिसली नाही ‘ती’ गोष्ट. तुम्हाला दिसतेेय का?”

या झाडाच्या बुंध्याला खुरटी, खरखरीत साल आहे. त्यावर पांढरे डाग, सडका रंग आणि आजूबाजूला उघड्या मुळ्या दिसतात. दिसायला हे सगळं अगदीच सामान्य, पण या बुंध्यावर बसलेला सरडा इतका कौशल्याने स्वतःला लपवून घेतो की, रंग आणि साल यांचं मिश्रण झाल्यामुळे तो अगदी अदृश्य झाल्यासारखा भासतो. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, या फोटोकडे कित्येक मिनिटे एकटक बघितल्याशिवाय तो कुठे आहे हे शोधणं जवळजवळ अशक्यच आहे.

आता खरी गंमत ऐका हा फोटो जेव्हा रेडिटवर टाकण्यात आला, तेव्हा हजारो लोकांनी तो चॅलेंज म्हणून स्वीकारला. काहींनी उघड मान्य केलं की “आम्ही हार मानली, सरडा सापडला नाही!” या फोटोतील सरड्याला कुठे पाहावं हे सांगणं सोपं नाही, कारण त्याचं रूप आणि झाडाची साल यांचं जणू एकरूप झालेलं आहे.

हा ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे डोळ्यांची खरी परीक्षा आहे. तुमच्यात धीर, लक्ष आणि धारदार निरीक्षणशक्ती असेल तरच तुम्हाला हा सरडा दिसेल, नाहीतर कितीही वेळा डोळे लावून बसलात, तरी तो तुमच्या नजरेतून सुटून जाईल.

म्हणूनच हे ऑप्टिकल इल्यूजन लोकांना एवढं आकर्षित करतात. फक्त मजेसाठीच नाही, तर अशा दृश्यं मेंदूला धारदार करण्यास, अवलोकनशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत करतात, असं अनेक संशोधनांतून स्पष्ट झालं आहे.

येथे फोटो पाहा

तर मग तुमचं काय? तुम्हाला या ‘मायावी सरड्या’चा ठाव लागला का? पाहा आणि आम्हाला पण सांगा कुठे लपलाय सरडा…