पाकिस्तानचे मनसुबे उद्धवस्त करून भारतीय लष्कराने कारगिलच्या उंच शिखरावर तिरंगा फडकवण्याचा मान मिळवला आहे. कारगील युद्धातील सैनिकांचे शौर्य पाहून पर्वतांच्या शिखरावर बसलेल्या शत्रूला पळ काढावा लागला. पण देशाच्या सैन्याने हा विजय इतक्या सहजा सहजी मिळवला नाही. हा विजय मिळवण्यासाठी शेकडो सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि जे वाचले ते अशा प्रकारे जगले की त्यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकून आजही अंगावर काटा उभा राहतो. देशाच्या अशाच एका शूर सैनिकाच्या शौर्याची गोष्ट तुमच्या अंगावरही काटा येईल. सोशल मिडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परमवीर चक्रने सन्मानित कॅप्टन योगेंद्र सिंह यांचा व्हिडीओ व्हायरल

एडवोकेट आदित्य आनंद यांनी केबीसीची एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये कॅप्टन योगेंद्र सिंह दिसत आहे ज्यांना कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानी घुसखोर/सैनिकांविरुद्ध केलेल्या धाडसी कारवाईबद्दल “सर्वोच्च भारतीय लष्करी अलंकार” मानले जाणाऱ्या “परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आले असून ते एक निवृत्त भारतीय लष्करी अधिकारी आहेत. अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये कॅप्टन योगेंद्र सिंह यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग सांगितला.

शत्रुने झाडल्या होत्या १५ गोळ्या

ही गोष्ट १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धातील आहे. कॅप्टन सिंह हे त्या लष्करी सैन्यांपैकी एक होते ज्यांच्यावर शत्रूने १५ गोळ्या झाडल्या होत्या. जेव्हा ते शत्रूचा सामना करत होते त्यावेळी पाकिस्तान सैन्य त्याच्या अगदी जवळ पोहचले होते आणि प्रत्येक सैनिकावर शत्रू वांरवार गोळीबार करत होते. कॅप्टन सिंह यांनी सांगितले की,”पाकिस्तानी सैनिकांद्वारे त्यांच्याजवळ आले आणि ते जिवंत आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्यांच्यावर गोळ्या झाडत होते. त्यांच्यावर शत्रूने १५ गोळ्या झाडल्या पण त्यांनी धीर सोडला नाही.

हेही वाचा – परदेशी निघालेल्या आईचा निरोप घेताना भावूक झाली जुळी लेकरं; व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात येतील अश्रू

जखमी स्थितीमध्ये शत्रूवर फेकला हँड ग्रेनेड

कॅप्टन योगेंद्र सिंग यांनी हिंमत सोडली नाही आणि जखमी स्थितीमध्येच शत्रुच्या दिशने ग्रेनेड फेकला आणि त्यांच्याच बंदूकीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर कसे तरी ते पुन्हा आपल्या कँपमध्ये पोहचले. तिथे पोहचल्यानंतर त्यांना विचारण्यात आले की, तुम्हाला काय हवे आहे का तेव्हा त्यांनी अन्न-पाण्याऐवजी बंदुकीच्या गोळ्या पाहिजेत असे सांगितले जेणेकरून त्यांच्या शत्रूला ते मारू शकतील. त्यांनी शत्रूची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर काही दिवस ते बेशुद्ध होते. बराच काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या शरीरातून सर्व गोळ्या काढल्या. त्यानंतर त्यांना बरे होण्यासाठी त्यांना काही वर्ष लागले पण त्यांना आनंद या गोष्टीचा आहे की ते शत्रूच्या तावडीत सापडले नाही.

हेही वाचा – शिळ्या भाकऱ्या खाऊन आनंदाने देशसेवा करतायत भारतीय जवान; हृदयस्पर्शी VIDEO पाहून त्यागाचे कौतुक कराल

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे. कॅप्टन सिंह यांच्या कामगिरीचे लोकांनी कौतूक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani soldiers firing 15 bullets even after he did not give up captain yogendra singh shared thrilling story of the kargil war video viral snk