Viral Poster: सोशल मीडियावर दररोज लाखो फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही विषय मजेशीर; तर काही गंभीर असतात. लग्न करताना काही तरुणांच्या आपल्या होणाऱ्या बायकोकडून अनेक अपेक्षा असतात. आपली जोडीदार समजूतदार असली पाहिजे, तिने कठीण प्रसंगात आपली साथ दिली पाहिजे अशा सामान्य अपेक्षा तर सगळ्यांच्याच असतात. पण, लग्नानंतर आपल्या जोडीदाराने आपल्याला अशीच हाक मारावी, अशी अपेक्षा एका तरुणाची आहे. ही अपेक्षा त्याने चक्क एका पाटीवर लिहून काढली आहे; ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा पुणेरी पाट्या, पोस्टर बॉय सोशल मीडियावर चर्चेत असतात. हातात पाटी घेऊन किंवा पोस्टर घेऊन हे पोस्टर बॉय रस्त्यावर, कुठे रेल्वेस्थानकाजवळ किंवा सार्वजनिक ठिकाणी उभे असतात. या पोस्टरवर एक खास संदेश लिहिलेला असतो, जो अनेकदा मजेशीर व खोचक असतो; तर कधी गंभीर असतो. सध्या असाच एक पोस्टर बॉय चर्चेत आला आहे; ज्याची त्याच्या होणाऱ्या बायकोकडून एक अपेक्षा आहे.

हेही वाचा… जीव वाचवण्यासाठी ‘ती’ कचऱ्याच्या पिशवीत लपली; स्कूटरवरून दोघे जण आले अन्…, पाहा थक्क करणारा VIDEO

व्हायरल पोस्टर

सोशल मीडियावरील व्हायरल झालेलं हे पोस्टर सध्या चर्चेत आहे. या पोस्टर बॉयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे; ज्यात तो एक पोस्टर घेऊन उभा आहे. “अहो, बोलणारी पाहिजे, पिल्लू तर कोंबडीचंपण असतंय,” असं या पोस्टरवर लिहिलेलं आहे. हा फोटो @rj_abhineet या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या फोटोला, “पटतंय का मंडळी?” अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

हेही वाचा… अशा मुलांना हीच शिक्षा मिळाली पाहिजे! वेट्रेसला तरुणाने नको त्या जागी केला स्पर्श, संतप्त तरुणीने केलं असं काही की…, पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

तरुणाचं पोस्टर पाहून अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “एकदम बरोबर बोललास भावा.” दुसऱ्यानं, “जी भेटेल ती बघ उगाच नको ते बोर्ड घेऊन मिरवू नको,” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “भाऊ घरी सांग, आम्हाला सांगून काही होणार नाही; आमचीपण तीच अवस्था आहे.”

हेही वाचा… ‘तो’ दोन तास शेजारी उभा होता; पण महिलेने रिकाम्या सीटवरून काढला नाही पाय, ट्रेनमधील ‘हा’ VIDEO पाहून सांगा चूक कोणाची?

दरम्यान, याआधीही सोशल मीडियावर अशा अनेक पाट्या व्हायरल झाल्या आहेत. सध्याचा हा पोस्टर बॉय काही दिवसांपासून चर्चेत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poster boy went viral for statement of getting wife puneri pati viral on social media dvr