Hyena VS Leopard Video: सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात तर काही व्हिडीओ मजेदार असतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. जंगलात शिकार करण्यासाठी जेवढे परिश्रम जंगली प्राण्यांना करावे लागतात, तेवढेच परिश्रम त्यांना केलेली शिकार इतर प्राण्यांपासून वाचविण्यासाठी करावे लागतात. या संबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जंगलात फक्त शिकार करणं महत्त्वाचं नसतं तर ती शिकार वाचवणं त्याहूनही कठीण असतं. कारण इथे शिकार करणाऱ्यांपेक्षा शिकार हिसकावून घेणाऱ्यांची संख्या जास्त असते. असंच काहीसं एका व्हिडीओत घडलंय, जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आपण काहीतरी खात असताना आपल्या हातातला किंवा ताटातला घास कुणी पळवला तर किती राग येतो ते तुम्हाला माहितीच आहे. त्याचीच प्रचिती देणारा व्हिडीओ व्हायरल होतोय.
वाघ सिंह, बिबट्या हे प्राणी आपली शिकार पकडताना किती मेहनत करतात, ते तुम्ही पाहिलंच असेल. अशा प्राण्यांच्या शिकारीचे बरेच व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका बिबट्याने जंगली डुकराची यशस्वी शिकार केली होती. तो डुकराला तोंडात धरून झाडावर चढवण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून इतर प्राण्यांपासून आपली शिकार सुरक्षित ठेवता येईल. मात्र, तेवढ्यात एंट्री झाली एका भुकेल्या आणि निर्भीड तरसाची. हा तरस एकटा असतानाही त्याने थेट बिबट्यावळ जाऊन त्याच्या जबड्यातून शिकार हिसकावून घेतली. हे सगळं इतकं वेगात आणि आक्रमकपणे घडलं की जंगलातल्या बेरहम शिकाऱ्याला म्हणजे बिबट्याला काहीच सुचेनासं झालं. आपली शिकार गमावल्यावर तो थेट झाडावर चढून स्वतःचा जीव वाचवतो.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे फक्त एकच तरस होता, तरीही बिबट्या त्याच्याशी दोन हात करायला तयार झाला नाही. जंगलातील हा ‘राजा’ असहाय्य वाटला.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर naturehuntdiaries या पेजवर शेअर करण्यात आला आहे आणि याला हजारो लोकांनी पाहिलं आहे. अनेकांनी यावर, “मेहनत कोणीतरी करतो, पण फळ कोणीतरी दुसरंच घेऊन जातं!” अशी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तर म्हटलंय की, “इतका लाचार बिबट्या आजवर कधी पाहिला नाही!”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.