Pune Viral Video : पुण्यात मानाच्या गणपतींपैकी एक असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती शहराची शान आहे. दरदिवशी हजारो भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येथे येतात. अनेक जण तर या गणपतीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाचा बस ड्रायव्हर बसमधूनच गणपतीला नमस्कार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण भावुक झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Viral Video : नवरीला पाहताच भरमांडवात नवरदेव ढसाढसा रडायला लागला, पाहा व्हायरल व्हिडीओ …

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की ११३ नंबरची पुणे महानगर परिवहन महामंडळाची बस श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या समोरून जाताना दिसत आहे. पुढे व्हिडीओमध्ये दिसेल की ड्रायव्हरने मंदिरासमोर बस थांबवली आणि बसमधूनच गणपतीला नमस्कार केला. त्यानंतर बस पुन्हा सुरू करून ड्रायव्हर आपल्या मार्गाने निघाला. गणपतीचा आशीर्वाद घेऊन बस ड्रायव्हर आपल्या कामाची सुरुवात करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

हेही वाचा : लसूण सोलण्याचा कंटाळा येतो? व्हायरल होणारी ही ट्रिक तुमच्या कामी येऊ शकते, पाहा जुगाड

@PuneriSpeaks या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “सोन्याची सकाळ सम्राट तुमच्या दारी व्हावी, माझं काय चुकलं असेल, त्याची क्षमा तुमच्या चरणापाशी असावी!
या व्हिडीओवर एका यूजरने लिहिले आहे, ” श्रीमंत”! तर आणखी एका यूजरने लिहिले आहे, “नेहमीच उच्चस्थानी आहात.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune viral video a pmpml bus driver greet shreemant dagdusheth halwai ganpati video goes viral ndj