बंगाली रसगुल्ल्याचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. अनेक जण रसगुल्ला आवडीने खातात. कोणताही विशेष प्रसंग असो किंवा कोणताही सण, जेवणात बंगाली रसुगल्ला आपली वेगळी छाप सोडतो. पण कोलकातामधील एका फूड वेंडरने रसगुल्ल्यासोबत एक वेगळा प्रयोग केला आहे, जो युजर्सना अजिबात आवडलेला आहे. पण सध्या मार्केटमध्ये रसगुल्ल्यापासून बनवलेल्या पदार्थांची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होणाऱ्या या भलत्याच पदार्थामुळे रसगुल्ल्याकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन बदलला आहे, यात ज्यांना रसगुल्ला आवडतो त्यांनी या पदार्थावर संताप व्यक्त केला आहे. रसगुल्ला हा बंगाली गोड पदार्थ विविध प्रकारे बनतो पण तुम्ही तो कधी रोलच्या स्वरूपात खाण्याची कल्पना करू शकता का? पण कोलकातामधील एका फूड वेंडरने रसगुल्ला रोल अशी भलतीच डिश तयार केली आहे. या विचित्र फूड फ्यूजनचा एक व्हिडीओ इ्न्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे, ज्याने ‘क्लासिक डेजर्ट’प्रेमींना निराश केले आहे.

ट्रॅफिकमध्ये फसल्याने ड्रायव्हरने वेळेचा केला ‘असा’ उपयोग; व्हायरल Video एकदा पाहाच

रसगुल्ल्याचा रोल बनवत खायला दिला. नंतर…

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका फूड वेंडरने रसगुल्ला रोल तयार करण्यासाठी प्रथम पिठाचा एक गोळा लाटून चपाती बनवली आणि ती नंतर भाजली. पुढे त्याने बॉलच्या आकाराच्या रसगुल्ले मसालेदार पिठात टाकून मिक्स केले, त्यानंतर एका कढईत तेल टाकून चिरलेला कांदा आणि शिमला मिरची परतून घेतली. यानंतर त्याने रोलसाठी बनवलेली चपाती घेतली. त्यावर फ्राय केलेला कांदा आणि शिमला मिरची घातली, यानंतर विचित्र दिसणारे रसगुल्ला मसाले त्यात ठेवले, त्यावर पुन्हा स्पेशल मसाला आणि मेओनिज टाकून रोल तयार करतो. अशा प्रकारे फूड वेंडर विचित्र अशी रसगुल्ला रोल डिश खाण्यासाठी देतो. इन्स्टाग्राम युजर्सनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

रसगुल्ला रोल रेसिपीचा व्हिडीओ व्हायरल होताच एका युजरने कमेंट करीत लिहिले की, ‘अनफॉलो करण्याची आणि पृथ्वी सोडण्याची वेळ आली आहे.’ तर दुसर्‍या एका युजरने सवाल केला की, ‘गंभीरपणे सांगा, रसगुल्ला, रोलबरोबर चांगला लागेल का? आमच्या खाद्यपदार्थांचे हे हाल का झाले?’ यावर तिसऱ्या एका खाद्यप्रेमीने विनोदी अंदाजात म्हटले की, गुन्हा दाखल करणार आहे. ज्यांनी हे केले त्यांना १४ वर्षांच्या तुरुंगवासाची मागणी मी करीत आहे. आणखी एक युजर म्हणाला की, “हे काय आहे? किमान रसगुल्ल्याबाबत तरी त्यांनी असे करू नये.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roshogolla rolls to the customer after watching the video social media users shocked sjr
First published on: 30-05-2023 at 12:47 IST