Cute girl viral video: आजच्या मुलांची विचार करण्याची आणि बोलण्याची पद्धत खूप वेगळी आहे. आजची मुले शाळेत न जाण्यासाठी अशी कारणे शोधतात की त्यांचे पालक त्यांच्यावर रागावतील की हसतील हे कळणे कठीण होते. सोशल मीडियावर सध्या एका गोंडस चिमुकलीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती आपल्या वडिलांसमोर शाळेत न जाण्याचा असा हट्ट धरते आणि असं कारण सांगते की ऐकणारा प्रत्येकजण हसून हसून थकतो. या चिमुकलीची निरागसता आणि गोड बोलणं पाहून तिने सगळ्यांचंच मन जिंकून घेतलं आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका वडील आणि त्याच्या लहान मुलीमधील मजेदार संवादावर आधारित आहे. मुलगी शाळेत जाण्यास नकार देते आणि तिचे कारण ऐकून तुमचे हसू आवरणे अशक्य आहे. @sia_3vedi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे आणि आतापर्यंत तब्बल ४० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
व्हिडीओमध्ये दिसतं की, चिमुकलीला शाळेसाठी तयार केलं जातंय, पण ती हट्टाने आपल्या वडिलांना म्हणते, “पप्पा, आज मला शाळेत पाठवू नका, माझं नाक बंद झालंय.” यावर तिचे वडील शांतपणे उत्तर देतात, “अच्छा, नाक बंद आहे, पण शाळा तर उघडी आहे ना?” हे ऐकून ती लहान मुलगी पूर्णपणे गोंधळून जाते आणि लगेच म्हणते, “बाबा, अशी मस्करी करू नका, शाळा नेहमीच उघडी असते, पण आता माझे नाक बंद आहे.”
वडील लगेच उत्तर देतात, “तू शाळेत गेलीस की नाक आपोआप उघडेल.” मुलगी लगेच प्रश्न विचारते, “आपोआप नाक कसं उघडतं?” यावर वडिलांचं उत्तर आणखीन मजेदार, “जेव्हा तू रात्री झोपतेस, तेव्हा तुझं नाक पण झोपतं आणि बंद होतं, नाहीतर डास आत जाईल. मग सकाळी ते परत उठतं.” मग चिमुकली पुन्हा निरागसपणे विचारते, “नाक सकाळी उठताना आळस करतं का?” हा संवाद इतका गोड आणि विनोदी आहे की कोणालाही हसू आवरणार नाही.
पाहा व्हिडिओ
या व्हिडीओखाली लोकांनी प्रतिक्रियांचा पाऊसच पाडला आहे. अनेकांनी लिहिलं, “ही मुलगी एक कँडी बॉम्ब आहे!” तर काहींनी म्हटलं, “आजच्या दिवसातला सगळ्यात क्युट व्हिडीओ पाहिला.” काहींनी तर त्या वडिलांचंही कौतुक केलं की त्यांनी मुलीच्या निरागस प्रश्नांना इतक्या मजेदार आणि संयमी पद्धतीने उत्तर दिलं. एकाने तर कमेंट केली, “हा व्हिडीओ पाहून माझा मूड फ्रेश झाला.” अनेकांनी या छोट्याशा संवादाला “फादर-डॉटर गोल्स” म्हटलं आहे.
मुलांची गोड निरागसता आणि त्यांचे बालिश विचार हे जगातील सर्वात मोठे मनोरंजन आहे हे या व्हिडीओवरून सिद्ध होते. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येही इतके प्रेम, गोडवा आणि हास्य असते की प्रत्येकजण त्यांचे बालपण आठवल्यावर हसतो.
