Shivaji park viral video: शिवाजी पार्कवर मनसेनं आयोजित केलेल्या ‘दीपोत्सवा’च्या निमित्ताने ठाकरे कुटुंबीयांच्या मनोमिलनाचा सोहळाच शुक्रवारी पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ‘दीपोत्सवा’चं उद्घाटन झालं.दरवर्षी दिवाळी आणि दीपोत्सवादरम्यान शेकडो लोक पार्कात जमतात. छान छान फोटो काढण्यासाठी, एकमेकांना भेटण्यासाठी अनेकजण मित्र परिवारासोबत त्याठिकाणी येत असतात. अशातच जर तुम्हीही शिवाजी पार्कला जाण्याचा प्लॅन करत असाल तर थांबा. कारण सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही शिवाजी पार्कला जाताना शंभर वेळ विचार कराल.
सोशल मीडियावर वेगवेगळ्या रिल्स, व्हिडीओ पाहून सर्वच शिवाजी पार्कला गेले की काय असा प्रश्न सध्या पडतोय. कारण शिवाजी पार्कवर एवढी गर्दी झालीय की धड उभंही राहता येत नाहीये. अक्षरश: चेंगराचेंगरीची परिस्थितीती त्याठिकाणी निर्माण झाल्याचं दिसत आहे. केवळ फोटोंसाठी हा अट्टाहास तरुण पिढी करत असून दिवाळीचा खरा आनंद घेणंच विसरल्याचं दिसत आहे. शिवाय एवढ्या गर्दीत जर चेंगरा चेंगरी झाली तर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे हा व्हिडीओ पाहून कळतंय.
पाहा व्हिडीओ
शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडणाऱ्यांवरुन रहिवाशांची लेखी तक्रार
दादरमधील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानामध्ये फटाके फोडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवाशी संघटनांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात रहिवाशी संघटनेकडून शिवाजी पार्क पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
शिवाजी पार्क रहिवासी संघटनांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरात फटाके फोडण्याची वेळ रात्री ८ ते १० या दोन तासांपुरती मर्यादित आहे. मात्र, दीपोत्सवाच्या कार्यक्रमात या वेळेचे पालन झाले नाही. परिणामी, परिसरात ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा स्तर झपाट्याने वाढला. पार्क परिसरात अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात, त्यामुळे या प्रदूषणाचा त्यांच्यावर गंभीर परिणाम झाला असल्याचे पत्रात म्हटलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार, मुंबईत फटाके फोडण्याची अधिकृत वेळ फक्त ८ ते १०आहे, असं पत्रात नमूद केले आहे. फटाके फोडण्यासाठी जमलेल्या शेकडो लोकांमुळे दरवर्षी शिवाजी पार्कमधील रहिवासी फटाक्यांच्या ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे खूप अस्वस्थ होतात. उद्यानाच्या परिसरात आणि आजूबाजूच्या भागात अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत अशी माहिती ही पत्रातून देण्यात आलेली आहे.