Bike Accident Shocking Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीने, तर काही दुसऱ्याच्या चुकीमुळे घडतात. सध्या अशाच एका बाईकच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्या अंगावर अक्षरश: काटा येईल. कारण- हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणून समोर आला आहे, जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क असले पाहिजे हे समजेल. तुम्हीच पाहा या अपघातात नेमकी चूक कुणाची होती?
एक बाईकस्वार रस्त्यावरील हायवेवर अनेक गाड्यांना कट मारून इतक्या वेगाने पुढे जातोय की, ते पाहून असे वाटतेय की, आपण कोणत्या बाईक रेसिंगचा गेम तर पाहत नाही ना. बाईकचा वेग इतका जास्त आहे की, पुढच्या क्षणी त्याचा मोठा अपघात होता होता टळतो. व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, बाईकस्वार हायवेवरील ट्रॅफिकमधून वेगाने बाईक पळवतोय. अचानक असा क्षण येतो जेव्हा त्याची एका धावत्या कारशी टक्कर होता होता वाचते. काही क्षण असे वाटते की, खरंच आता तो बाईकवरून जोरात खाली कोसळला आणि अखेर मृत्यूने त्याला गाठले; पण पुढच्याच क्षणी कसाबसा तो बाईक सावरत पुन्हा पळू लागतो. पण हा क्षण पाहताना आपल्याला अक्षरश: धडकी भरते. यावेळी रस्त्यावरून धावणाऱ्या इतर वाहनांचे चालकही घाबरतात.
यात धक्कादायक गोष्ट म्हणजे बाईकस्वार यावेळी व्हिडीओ बनवण्यात व्यग्र होता आणि तो हायवेवर बाईक चालवतोय हेही विसरला होता, असे वाटते. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसून येतेय की, तो जाणूनबुजून धोकादायक स्टंट करीत स्वतःचा जीव धोक्यात घालत होता. तो वाचला हे त्याचे भाग्य होते; परंतु सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून खूप संताप व्यक्त केला जात आहे. कारण- असे स्टंट करणारे केवळ स्वतःचा जीवच नाही, तर इतरांचा जीवही धोक्यात घालतात. दरम्यान, अनेकांनी यात बाईकस्वाराची चूक होती, असे म्हटले आहे.
या धोकादायक अपघातातून कारचालक आणि बाईकस्वार थोडक्यात बचावतात. पण, त्यानंतर संबंधित कारचालक आपली कार पुढे थांबवतो आणि नंतर खाली उतरतो. बाईकस्वाराला त्याच्या तब्येतीची विचारपूस करतो. बाईक स्वर कारचालकाला अगदी मृदू स्वरात सांगतो की, ठीक आहे, मी ठीक आहे. दरम्यान, अपघाताचा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यावर लोकही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
अपघाताचा हा थरारक व्हिडीओ @DudespostingWs नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, अशा लोकांमुळे इतरांचे जीवनही धोक्यात येते. दुसऱ्या युजरने लिहिले की, नशीब चांगले म्हणून वाचला; अन्यथा मृत्यूच झाला असता. तर तिसऱ्याने लिहिले की, १०० पैकी १०० वेळा बायकर्सची चूक असते.