Shocking video: सिंह हा किती खतरनाक शिकारी आहे, हे काही वेगळं सांगायला नको. वेळ आली तर तो एका भल्यामोठ्या हत्तीला देखील फाडून टाकू शकतो इतकी प्रचंड ताकत त्याच्याकडे आहे. सिंह शिकारीवर निघाला की अख्खं जंगल भितीनं थरथर कापतं. अन् म्हणूनच त्याला जंगलाचा राजा म्हणतात. पण सिंहीणही काही कमी नाही यावेळी चक्क एखा सिंहीण बिबट्याला भिडलीय. खरं तर हा सिंहीण बिबट्याची शिकार करत होती. पण बिबट्या सुद्धा अनुभवी शिकारी आहे. त्यानं सिंहीणीवर जोरदार प्रतिहल्ला केला. शेवटी या युद्धात कोण जिंकलं हे आता तुम्हीच पाहा. विशेष म्हणजे ही लढाई चक्क झाडावर सुरु होती. या लढाईचा शेवट पाहून तुम्ही देखील चकित व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जंगली शिकारी कधीही तुल्यबळ प्राण्यांवर हल्ला करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. कारण लढाईमध्ये ते स्वत: सुद्ध जबरदस्त जखमी होण्याची शक्यता असते. अन् त्यामुळे ते नेहमी हरीण, झेब्रा, वनगाय यांसारख्या शाकाराही प्राण्यांची शिकार करतात. मात्र इथे सिंहीणीनं बिबट्याची खोड काढलीये.

तर झालं असं की सिंहीण बिबट्याचा पाठलाग करत झाडावर चढली. पण बिबट्यासुद्धा डोकेबाज त्यानं हळूहळू सिंहिणीला अत्यंत कमकूवत असलेल्या फांदीवर नेलं. मग काय फांदीवर जोर पडलाच ती मोडली आणि दोघंही खाली पडले. पण बिबट्या उंच उड्या मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे खाली पडताच त्यानं आपलं संतुलन राखलं आणि तो पळून गेला. पण दुसरीकडे सिंहिण मात्र जबरदस्त दुखापतीमुळे खालीच बसून राहिली.या संपूर्ण चकमकीत बिबट्याने हे सिद्ध केले की जंगलात केवळ ताकदच नाही तर चपळताही खूप महत्त्वाची असते. शेवटी बिबट्या आपल्या चपळाईने झाडावरून सुखरूप निसटतो.सिंह कितीही चपळ असला तरी बिबट्या गर्द झाडीमध्ये लपण्यास पटाईत आहे. त्यामुळे शेवटी बिबट्याने या लढाईत बाजी मारली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की

बिबट्याचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेली ही क्लिप अवघ्या काही सेकंदांची आहे, पण ती पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. कमेंट सेक्शनमधील प्रत्येकजण हेच सांगत आहे, हा प्राणी खरोखरच शक्तिशाली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video lion and leopard clashed on a tree thrilling fight video went viral on social media watch the what happened at the end srk