AC Outdoor Unit Fire Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात यातले काही व्हिडीओ पाहून धक्काच बसतो. व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये काही अशा धक्कादायक घटना घडलेल्या असतात ज्या भविष्यात आपल्या आजूबाजूलाही घडू शकतात. त्यामुळे असे व्हिडीओ पाहून एका बाजूला भीती वाटते पण सतर्क राहण्याचा इशाराही मिळतो.
आजच्या या वातावरणात उन्हाळा असो, पावसाळा किंवा हिवाळा लोक एअर कंडिशनरचा (एसीचा) वापर मोठ्या प्रमाणात करतात. पण कोणतीही वस्तू अतिप्रमाणात वापरली किंवा तिच्या देखभालीकडे दुर्लक्ष केलं तर भयंकर घटना घडू शकते. सध्या अशीच घटना विरार येथे घडली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एसीच्या आउटडोअर युनिटला आग (Fire AC Outdoor Unit)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एसीच्या आउटडोअर युनिटला अचानक आग लागली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही.
एसी हवेतील ओलावा शोषून घेतं आणि पाईपद्वारे पाण्याच्या स्वरूपात बाहेर फेकतं. एसीला एक आउटडोअर युनिटही असतं ते हे काम करत असतं. याच आउटडोअर युनिटला ही आग लागली असल्याचं व्हिडीओतून दिसून येतंय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @virarmerijaan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २ लाखांच्यावर व्ह्यूज आले आहेत. तसंच “एसीच्या आउटडोइर युनिटला आग” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया (Shocking Video Viral)
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बापरे ही बिल्डिंग प्रकृती हॉस्पिटल समोरच आहे. आमच्या बाजूच्या परिसरात हे घडलंय”, तर दुसऱ्याने “बापरे सगळी कडे आगच आग का लागते आहे.” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “बापरे, ज्यांच्या घरात एसी आहे त्यांनी काळजी घ्यायला हवी ” तर एकाने “धक्कादायक घटना” अशी कमेंट केली.