‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण अनेकदा वाचलं ऐकलं असेल. म्हणून उशीर होत असला तरी घाई न करता सुरक्षित प्रवास करावा, असं सांगितलं जातं. तरीही लोक आपलंच खरं करतात आणि अडचणीत सापडतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर अनेकदा रस्ते अपघातांचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असे भयंकर अपघात पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो.

रस्त्यावर वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवताना काही जणांना आजूबाजूच्या गोष्टींचं भानच नसतं आणि हेच कारण अनेक अपघातांना पुरेसं ठरतं. सध्या सोशल मीडियावर एका अशाच अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्याच एका बाइकचा अपघात झाला आहे. नेमकं काय घडलं, जाणून घ्या…

अपघाताचा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका टेम्पोच्या मागून एक बाइकचालक आपली बाइक योग्य रितीने चालवत असतो. तेवढ्यात टेम्पोचालक अचानक ब्रेक मारतो. यामुळे बाइकस्वारही आपली गाडी नियंत्रणात आणून ब्रेक मारतो. या बाइकवर बाइकचालकासह मागे अजून एक व्यक्ती बसलेली असते. तेवढ्यात मागून अगदी भरधाव वेगात ट्रक येतो आणि त्या बाइकला धडक देतोय बाइकला धडक देताच पुढच्या टेम्पोच्या आणि मागच्या ट्रकच्या मधोमध दोघे चिरडले जातात. पण तेवढ्यात ट्रकचालकदेखील ब्रेक मारतो. पण या अपघातात दोघांनाही दुखापत झाल्याचं दिसून येतंय.

व्हिडीओची लिंक

https://www.instagram.com/reel/DFeMy3zS6dN

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @sakibul8571 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘शेवटपर्यंत नक्की बघा’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच या व्हिडीओला ३ लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, ज्याचं कोणी नाही त्याचा देव आहे” दुसऱ्याने कमेंट करत लिहिले, “बापरे, भयंकर अपघात झाला हा” एकाने, “कृपया या ट्रकचालकावर कारवाई करा.” अशी कमेंट केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of bike accident where truck hits the bike video viral on social media dvr