Shocking Video: वर्षानुवर्षं मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. आजही देशात महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या उघडपणे फिरतात. भररस्त्यात सगळ्यांसमोर महिलांची छेड काढतात, त्यांच्यावर हल्ला करतात. आणि या सगळ्यात ते काही चुकीचं करतायत असं त्यांना वाटतही नाही.

अशा परिस्थितीत काही मुली आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात, तर काही जणी तसाच अत्याचार सहन करत घाबरून शांत बसतात. सध्या अशीच भयंकर घटना एका तरुणीबरोबर घडलीय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओ (Woman Abuse Viral Video)

राजस्थानच्या जयपूरमध्ये एका मिठाईच्या दुकानाबाहेर एका माणसाने एका महिलेची छेड काढली. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये माणूस महिलेचा छातीला हात लावून गेल्याचं दिसून येत आहे.

अहवालांनुसार, ही घटना रविवारी संध्याकाळी प्रसिद्ध राजस्थान मिठाई दुकानाच्या बाहेर घडली. आरोपीचं नाव गौतम आहे, ज्याला लोकांनी महिलेची छेड काढल्याबद्दल मारलं आणि नंतर पोलिसांकडे सोपवले. अहवालांनुसार, आरोपीने मिठाईच्या दुकानाबाहेरून जात असलेल्या महिलेला चुकीच्या पद्धतीने हात लावण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली गेली.

महिलेने ताबडतोब ओरडून तक्रार केली. त्यानंतर दुकानात असलेल्या ग्राहकांनी गौतमला पकडले. रागावलेल्या लोकांनी आरोपीला जोरदार मारहाण केली, त्याच्या कानाखाली मारले, रागाने धमकावले आणि नंतर पोलिसांकडे सोपवले.

अहवालांनुसार, पोलिसांनी गौतमविरुद्ध पोस्को आणि छेडछाड कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. स्थानिक लोक हे महिलांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न निर्माण करणारे प्रकरण म्हणून पाहत आहेत, तर दुकान मालकाने सुरक्षा उपाय मजबूत करण्याचे आश्वासन दिले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @gnwnews_a या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “याला कठोर शिक्षा झाली पाहिजे” तर दुसऱ्यानं “पोलिसांनी याच्या गंभीर गुन्हे दाखल करून जन्मठेपच द्यावी” अशी कमेंट केली. तर एकाने कमेंट करत लिहिलं, “अशा लोकांमुळे मुलींवर, स्त्रियांवर अत्याचार होतात अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना जशाच तसे उत्तर दिले पाहिजे.”