Man Records Video under Woman’s skirt: वर्षानुवर्षे मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडियावर वृत्तपत्रांमध्ये, बातम्यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठे तरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या खुले फिरतायत. त्यात काही मुली आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात; तर काही जणी घाबरून शांत बसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या अशीच घटना एका ठिकाणी घडलीय. ज्यात एका माणसाने मॉलमध्ये एका तरुणीचा अश्लील व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊ…

माणसाचं अश्लील कृत्य व्हायरल (Shocking Video Viral)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका मॉलमधील एस्केलेटरवर खूप गर्दी आहे. त्याच गर्दीत एक तरुणी शॉर्ट स्कर्ट घालून एस्केलेटेरवर चढताना दिसतेय. तेवढ्यात तिच्या मागे एक तरुण लपून तिच्या स्कर्टखाली कॅमेरा धरून तिचा व्हिडीओ काढताना दिसला. हे घाणेर्ड कृत्य करताना त्याला कसंलीही लाज वाटत नाहीय. मॉलमधील गर्दीमध्ये तो त्याचं हे धक्कादायक कृत्य करताना दिसतोय. दरम्यान ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकलं नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @mustsharenews या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली असून “मूळ पोस्टरमध्ये असा दावा करण्यात आला होता की तो माणूस त्याच्या पत्नी आणि लहान मुलीसह मॉलमध्ये होता.” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, ज्याने व्हिडीओ रेकॉर्ड केला त्याने कोणती कारवाई केली का? तर दुसऱ्याने “याची पोलिसांकडे तक्रार” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “त्याचं तोंड का ब्लर करावं”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of man records video of woman skirt viral video on social media dvr