Shocking Video: सासू आणि सूनेचं नातं अगदी वेगळं असतं. अनेकदा मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये कधी खाष्ट सासू दाखवली जाते तर कधी प्रेमळ सासू. खऱ्या आयुष्यातही असंच काहीसं असतं. सासू सुनेच्या नात्यात जेवढे खटके उडतात तेवढंच प्रेम आदरही असतो. पण, अनेकदा या नात्यांमध्ये कोणीतरी वरचढ ठरतं आणि वादाला सुरुवात होते. अशा वादात शाब्दिक भांडणं तर होतातच. पण अनेकदा मारहाणीपर्यंतही पोहोचतात.
सुनेचा सासूकडून छळ होतो असंही आपण ऐकतो, पण काही सुना साधी माणुसकीही बाळगत नाहीत आणि आपल्या सासूच्या साधेपणाचा फायदा घेतात आणि सासवांचाच छळ करतात. सध्या अशीच एक भयंकर घटना एका ठिकाणी घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सुनेने सासूबरोबर नेमकं काय केलं, जाणून घ्या…
सासू सूनेचा व्हायरल व्हिडीओ (Daughter in Law attacks Mother in Law Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हिडीओच्या कॅप्शननुसार या धक्कादायक घटनेत, २९ जून रोजी निहारिका जैस्वाल यांनी आपल्या ७८ वर्षीय सासूवर हल्ला केला, असे आरोप आहेत. त्यांनी सासूच्या डोळ्याला चावा घेतल्यामुळे त्यांचा डोळा निकामी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसक हल्ल्यात वृद्ध महिलेच्या डोळ्याची लेन्स गंभीररीत्या खराब झाली आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्याची दृष्टी गेली. ही घटना समोर आल्यावर जनतेत संताप उसळला असून आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @thetimespatriot या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २. ८ मिलियन व्ह्युज आले आहेत. तसंच “सुन ७८ वर्षाच्या सासूच्या डोळ्याला चावली आणि तिला आंधळं केलं” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “कधीकधी तुम्हाला फक्त तेच दिसतं जे तुम्ही पाहिलं. पण तुम्हाला खरं कारण माहित नसतं. कदाचित त्या महिलेनेच तिला डिवचलं असेल.” तर दुसऱ्याने “कशी हिंमत होते हे सगळं करण्याची” अशी कमेंट केली.