Unhygienic vegetables video : सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, असं म्हणत आपण आहारात सर्व भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करीत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे. कारण- भाजी मंडईभोवती अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालेभाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून, ग्राहक भाजी घेतात की आजार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इथपर्यंत ठीक होतं; मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून भाज्या थेट आता शेतातूनच आणायच्या का, असा सवाल उपस्थित होतोय. जे गाजर तुम्ही चविने खाता, गाजरचा हलवा बनवता ते गाजर तुमच्यापर्यंत कसे हे पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. भाजी विक्रेत्यांचा घृणास्पद व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ गाजर धुतानाचा आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नदीजवळ एका मोठ्या क्रेटमध्ये अनेक लोक गाजर घेऊन बसलेले दिसत होते. एक व्यक्ती बादलीतून या गाजरांवर पाणी टाकत होती. बाकीचे लोक आरामात बसून चक्क पायांच्या साहाय्याने गाजर घासून स्वच्छ करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळाली नाही मात्र, हा एक प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळच आहे. हे खाल्ल्यावर नक्कीच आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतील. हा व्हिडीओ पाहून तुम्ही गाजर घेताना १०० वेळा विचार कराल हे नक्की…
बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाह. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIRAL: ६ वीतल्या विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात; भूमिका मॅडमसाठी लिहिलेला निबंध होतोय तुफान व्हायरल
हा व्हिडीओ foodie_saurabh_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून नेटकरी यावर संताप व्यक्त करीत आहेत. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत या लोकांवर कारवाईची मागणी करत आहेत.