Shocking Video: सध्या दिल्लीतील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी एका बाइक टॅक्सी चालकावर रस्त्याच्या मध्यभागी लैंगिक छळाचा आरोप करताना दिसतेय. ‘नॅशनल कौन्सिल फॉर मेन्स अफेअर्स’ नावाच्या एनजीओने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तरुणी, हेल्मेट घातलेल्या बाइकवर बसलेल्या एका पुरुषाबरोबर वाद घालताना दिसतेय.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

व्हिडिओमध्ये ती तरुणी असं म्हणताना ऐकू येते: “असं कसं कॅन्सल करू? आधी तक्रार जाईल, मगच कॅन्सल होईल,” म्हणजेच, “मी एकदम राईड कशी कॅन्सल करू? आधी तक्रार करेन, नंतर कॅन्सल करेन.” त्यानंतर ती ड्रायव्हरला ठामपणे सांगते: “चल, तू निघ इथून”

या घटनास्थळी अनेक लोक आसपास थांबलेले दिसतात आणि त्यापैकी एक माणूस तरुणीला सुचवतो की रस्त्यावर वाद घालण्यापेक्षा पोलिसांकडे तक्रार दाखल करावी. यावर ती महिला म्हणते: “मी भांडण का नको करू, हा असभ्य वर्तन करतोय, याला मारूपण नको मी?”

यावर तो माणूस तिला सांगतो की तिला मारहाण करण्याचा अधिकार नाही. यावर ती महिला गंभीर आरोप करत म्हणते: “हा माझ्याशी वाईट वागेल, माझ्या छातीवर हात ठेवेल, ते चालेल का?”

तो माणूस पुन्हा तिला सांगतो की जर अशा प्रकारे गैरवर्तन झालं असेल, तर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली पाहिजे, कारण रस्त्यावर भांडण करणं हा उपाय नाही.

एका क्षणी ती महिला त्या माणसावर रागावते आणि म्हणते: “तुमच्यासारख्या लोकांमुळेच दिल्ली सुरक्षित नाही.” यावर तो माणूस लगेच उत्तर देत म्हणतो: “दिल्ली सुरक्षित आहे.”

नंतर व्हिडिओमध्ये ती महिला सांगते की ड्रायव्हरचं बेफिकीरीने वाहन चालवत होता. यावर ड्रायव्हर उत्तर देतो: “मॅडम, तिथे गाडी आली, तर मी तिच्यावर धडक मारू का?”

तेव्हा ती महिला म्हणते, “आता खरी गोष्ट बाहेर येते आहे,” आणि त्या माणसाला सांगते की, “ही घटना तुमच्याशी संबंधित नाही, त्यामुळे तुम्हाला मध्ये बोलण्याचा अधिकार नाही.”

दुसरी एक तरुणी घटनास्थळी येते

दुसरी एक तरुणी, येऊन परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ संपण्याच्या आधी, रागवलेली तरुणी अजून एक गंभीर आरोप त्याच्यावर करते की, तो पुरुष वारंवार ब्रेक मारत होता कारण तिच्या छातीचा स्पर्श त्याला व्हावा.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @NCMIndiaa या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “काळ बदलत आहे आणि लोक हळूहळू अधिक समजूतदार होत आहेत.” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २५०.६ हजार व्ह्यूज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “कमीत कमी पुरूष खोट्या स्त्रीवादाविरुद्धच्या या लढाईत इतर पुरूषांना मदत करत आहेत हे खरे आहे.” तर दुसऱ्यानं “जर तिला कंफरटेबल वाटत नसेल तर तिने बाईक टॅक्सी का बुक केली?? तिला बस, ऑटो किंवा कॅब सहज मिळू शकली असती. नेहमीच पुरुषांना विनाकारण दोष का द्यायचा?” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “मोफत कॅब प्रवास, मोफत जेवण आणि कपडे मिळवण्यासाठी स्त्रीवाद्यांनी केलेला हा एक जुना घोटाळा आहे. अस्तित्वात नसलेल्या मुद्द्यावर गोंधळ घालणे. ”