Shocking Viral Video : समुद्रातील अनेक मोठे मासे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात व्हेल माशाचाही समावेश आहे. कारण- समुद्रातील त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यांच्या या ऱ्हासाला आपण मानवप्राणीच कारणीभूत आहोत. माणसांच्या चुकांमुळे आज नैसर्गिक अधिवासात राहणारे जीव नष्ट होत आहेत; पण स्वार्थी माणसांना कशाचीच पर्वा नाही. पृथ्वीवरील जीव, प्राणी नष्ट झाले तरी चालतील; पण आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवल्याच पाहिजेत, अशी मानसिकता आजकाल दिसून येते. त्यामुळे व्हेल माशांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय; परंतु लोकांनी मृत व्हेल माशाचे शरीरदेखील सोडले नाही. होय… तुम्हाला जाणून धक्का बसेल; पण सध्या सोशल मीडियावर काही लोकांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यात ते मृत व्हेलच्या अंगावर चक्क नाचताना दिसत आहेत; जे पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
व्हेलच्या मृतदेहावर नाचले तरुण
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, खोल समुद्राच्या पृष्ठभागावर मृत व्हेलचा मृतदेह तरंगताना दिसत आहे. यावेळी मृत माशाच्या शरीरावर चढून दोन तरुण आनंदाने नाचताना, उड्या मारताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये असे दिसते की, मृत व्हेल मासा हा खूपच मोठा होता. कॅमेऱ्यात या माशाचा मृतदेह समुद्रात असलेल्या मोठ्या खडकाप्रमाणे दिसतोय.
असे म्हटले जाते की, मृत्यूनंतरही व्हेल माशाचे शरीर खूप धोकादायक असते. मृत्यूनंतर व्हेल मासे तरंगत समुद्राच्या किनाऱ्यावर येतात. हा मासा मेल्यानंतर त्यांच्या शरीराचा स्फोट होऊ शकतो. स्फोटामुळे त्यांचे शरीर पूर्णत: फुटते. असे असूनही या दोघांची मजा काही थांबलेली नाही. कदाचित या लोकांना हे माहीत नसावे म्हणून ते अशा प्रकारे नाचत आहेत. त्याच वेळी व्हेलच्या मृतदेहाजवळ उभ्या असलेल्या जहाजावर उपस्थित असलेली एक व्यक्ती या दोघांच्या कृतीचा व्हिडिओ शूट करीत आहे.
Read More Trending News Today : Dahi Handi 2024 : दहीहंडीचा असा थरार फक्त कोकणातच! ४० फूट खोल विहिरीत नेमकी कशी फोडतात हंडी, एकदा पाहाच Video
“हे अतिशय संतापजनक कृत्य” युजर्सची प्रतिक्रिया
हा व्हिडीओ एक्सवर @AMAZlNGNATURE नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत हजारो लोकांनी लाइक केला आहे. इतर अनेक लोकांनी कमेंट्समध्ये व्हेल माशाशी संबंधित माहिती आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तर काहींनी या तरुणांचे हे कृत्य अतिशय संतापजनक असल्याचे म्हटले आहे.
© IE Online Media Services (P) Ltd