Viral Video of Brother and Sister : बहीण आणि भावाचे नाते हे सर्वांत सुंदर नात्यांपैकी एक आहे. दाखवत नसले ती एकमेकांवर खूप प्रेमही करतातबहीण आणि भाऊ कधी एकमेकांबरोबर भांडतात, कधी एकमेकांबरोबर मज्जा-मस्ती करतात. कधी भाऊ बहिणीची खोडी काढून पसार होतो तर कधी बहीण भावाची तक्रार करते ज्यामुळे त्याला आई-वडीलांचा ओरडा बसतो. कधी एकमेकांना नाव ठेवतात, कधीच एकमेकांचे तोंडावर कौतुक करत नाही. अशाच एका बहीण भावाच्या नात्याची झलक दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये भाऊ बहिणीचे पाय धुवून पाणी पित आहे. व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. नक्की असे काय घडले हे जाणून घेण्यास नेटकरी उत्सूक आहेत.

त्याचे झाले असे की, बहीण भावांमध्ये एक पैंज लागली होती ही पैंज बहि‍णीने जिंकल्यामुळे भावना तिचे पाय धुवून पाणी प्यावे लागले. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, तीन भाऊ आपल्या बहिणीनीचे पाय पाण्याने धूवत आहे. एक मुलगी स्टूलवर बसली आहे आणि एका ताटात पाय ठेवले आहे. एक जण तिच्या पायावर पाणी ओततो आहे. इतर दोघे तिचे पाय धूवत आहे. खरी मज्जा तेव्हा येते जेव्हा ते पाणी प्यायची वेळ येते. सर्वजण हे करण्यासाठी संकोच करत आहे. तरीही प्रत्येक जण चमच्याने तोंडात पाणी टाकताना दिसतात. पण नक्की अशा काय पैंज होती असे सर्वांना प्रश्न पडला असेल.

तर पैंज अशी होती की, जर बहीण दहावीची परीक्षा पास झाली तर हे भावांना आपल्या बहिणीचे पाय धूवून पाणी प्यावे लागेल. नुकताच दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला. बहिणीने दहावीत पास होऊन दाखवले आणि पैंज जिंकली. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणे अशक्य आहे. तिघा भावांची झालेली फजिती पाहून नेटकरी देखील खळखळून हसत आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.

पाहा Viral Video

व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “बहीण हे आईचं दुसरं रुप असते.”

तर दुसऱ्याने लिहिले की, “पैंज लावावी तर अशी.”

Live Updates