Thane railway station viral video: मुंबईतील एल्फिन्स्टन व परळ या रेल्वेस्थानकांना जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि त्या दुर्घटनेत २२ जणांनी प्राण गमावले. आजही त्या दुर्घटनेचे चित्र, ती भयावह परिस्थिती डोळ्यांसमोर उभी राहते तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. आता तुम्ही म्हणाल त्या दुर्घटनेची आठवण आता कशाला? तर हा व्हिडीओ पाहा: सध्या सोशल मीडियावर ठाणे रेल्वेस्थानकातील एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये ठाण्यातील गर्दीचे भीषण वास्तव पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तुम्हालाही एल्फिन्स्टनसारख्या दुर्घटनेची आठवण येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ठाणे रेल्वेस्थानकात पुलाचे काम सुरू असल्याने एकाच पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. गर्दीमध्ये लहान मुलं, महिला वर्ग, ज्येष्ठ व्यक्ती चेंगरले जाण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने यावर योग्य तो निर्णय घेऊन यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. नाही तर दुर्घटना घडायला वेळ लागणार नाही. सकाळी ८ ते १० या वेळी रेल्वेस्थानकं प्रवाशांनी भरलेली असतात. कॉलेज, ऑफिसला जाण्यासाठी प्रत्येक जण धावत असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते. हा व्हिडीओतील स्थिती पाहून सर्वच जण त्याबाबत संताप व्यक्त करीत आहेत. या व्हिडीओमध्ये पाहिलं तर लक्षात येईल की, एक पोलिस कर्मचारी त्या ठिकाणी गर्दीचं नियोजन करताना दिसत आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येतील प्रवाशांचं व्यवस्थापन करणं त्यांनाही कठीण जात आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! शाळेतील ९० मुलींना एकाच वेळी अर्धांगवायूचा झटका? VIDEO पाहून उडेल थरकाप…

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जगाच्या कान्याकोपऱ्यांतील घटना आजकाल सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचते. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही यावर संताप व्यक्त करीत आहेत. पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करून प्रवाशांची गैरसोय दूर करा, अशी मागणी केली जात आहे. अशाच प्रकारे अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओबाबत येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane railway station rush platform no 7 bridge dangerous viral video shocking video viral on internet srk