मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एक शेतकरी आपल्या म्हशीने दूध न दिल्याने नाराज झाला आणि त्याने आपली समस्या घेऊन पोलीस स्टेशन गाठले. माहिती देताना भिंडच्या नयागाव पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले की, अर्ज सादर केल्यानंतर सुमारे चार तासांनी शेतकरी आपल्या म्हशीसह पोलीस ठाण्यात आला आणि त्यानंतर मदत मागितली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जादूटोणा झाल्याचा शेतकऱ्याचा संशय

पोलिस उपअधीक्षक अरविंद शहा म्हणाले, “बाबुलाल जाटव यांनी त्यांची म्हैस गेल्या काही दिवसांपासून दूध देत नसल्याची तक्रार नयागाव पोलिस ठाण्यात दिली आहे.” त्यांनी सांगितले की, तक्रारदार बाबूलाल जाटव यांच्या म्हणण्यानुसार, काही गावकऱ्यांनी त्यांना सांगितले की, म्हैस जादूटोण्याच्या प्रभावाखाली आहे आणि त्यामुळे तिने दूध देणे बंद केले आहे.

( हे ही वाचा: वृद्ध महिलेने रिक्षाचालकाला दिला तीन मजली बंगला आणि करोडोंची संपत्ती; कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य )

दूध काढण्यासाठी पोलिसांनी मदत करावी : तक्रारदार

तक्रारदार बाबूलाल जाटव यांनी स्टेशन प्रभारी हरजेंद्रसिंग चौहान यांच्याकडे दाद मागितली आणि सांगितले की, “साहेब! आमची म्हैस दूध देत नाही. पूर्वी माझी म्हैस रोज पाच ते साडेपाच लिटर दूध द्यायची. त्यामुळे पोलिसांनी मला दूध काढण्यात मदत करावी अशी माझी इच्छा आहे. पोलिसांनी मला मदत केली तर मी तुमचा सदैव ऋणी राहीन.

( हे ही वाचा: १३ कोटी भरून मॉडेलने ‘या’ विशेष भागाचा उतरवला विमा! कारण जाणून वाटेल आश्चर्य )

पोलिसांनी या समस्येवर काढला तोडगा

अरविंद शहा म्हणाले, “मी स्टेशन प्रभारींना गावकऱ्याला पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले होते. स्टेशन प्रभारी हरजेंद्र सिंह चौहान यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांशी चर्चा केली आणि डॉक्टरांनी काही टिप्स दिल्या. स्टेशन प्रभारींनी बाबूलाल यांना हीच सूचना सांगितली आणि त्या आधारे बाबूरामने दूध काढले तेव्हा म्हशीने दूध काढण्यास परवानगी दिली.”

( हे ही वाचा: T20 WC: पाकिस्तानच्या चाहत्यांकडून धमक्यांच्या बातम्यांवर हसन अलीच्या पत्नीने केली सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाली…)

जनावरांच्या दवाखान्यात जा, पोलीस ठाण्यात नाही

स्टेशन प्रभारी म्हणाले, यानंतर तक्रारदाराने दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांचे आभार मानत त्यांनी सांगितले की, रविवारी सकाळपासून म्हशीने पुन्हा दूध देण्यास सुरुवात केली आहे. यानंतर त्यांनी बाबुलाल यांना जनावरांना होणारे आजार किंवा इतर समस्यांबाबत पोलिसांशी नाही तर प्राणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यास सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Troubled farmer reached thane police station for help as buffalo did not give milk ttg