Viral wedding card: सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे. त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कधी वधू-वरांचे व्हिडीओ व्हायरल होतात, तर कधी लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या कृतीही व्हायरल होऊ लागतात. नुकतीच लग्नाची पत्रिका व्हायरल झाली. व्हायरल होण्याचे कारण म्हणजे त्याच्या आत लिहिलेली गोष्ट.आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की नक्की त्यात असं काय असेल? लग्नात काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. यात लग्नपत्रिकाही अपवाद नाही. कधी लग्नपत्रिकाच विचित्र असते तर कधी त्यातील मजकूर. अशा कितीतरी लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यात आता आणखी एका लग्नपत्रिकेची भर पडली आहे.
एका तरुणानं चक्क मुंबई लोकलमध्येच आपल्या लग्नाचं अनोखं आमंत्रण दिलं आहे. हे आमंत्रण पाहून तुम्हीही अवाक् व्हाल आणि तरुणाचं कौतुक कराल. रेल्वेच्या दरवाजाजवळ जिथे ‘पुढचं स्टेशन अमुक-तमुक’ असं लिहिलं जातं, तिथेच या नवरदेवाने आपल्या लग्नाची तारीख आणि ठिकाण झळकवलं आहे. त्याचा उत्साह आणि कल्पकता पाहून अनेकांनी कौतुक केलं आहे. खरंच, अशा हटके स्टाईलनं दिलेलं लग्नाचं आमंत्रण पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण स्वत:च्या लग्नाचं अनोख्या पद्धतीने आमंत्रण देताना दिसतो. मुंबई लोकलच्या इंडिकेटरवर, जिथे सामान्यतः पुढच्या स्टेशनची माहिती दिली जाते, तिथेच त्याने लग्नाची पत्रिका झळकवली आहे.”चि. निकेश आणि चि.सौ.का. समिक्षा यांचा शुभविवाह येत्या २५/५/२०२५ रोजी दुपारी १२.३५ वाजता संपन्न होणार आहे” असा मजकूर त्या स्क्रीनवर झळकतोय. इतकंच नव्हे तर, वधू-वरांचे फोटोसुद्धा लोकलमधील डिजिटल स्क्रीनवर झळकत आहेत. हा अनोखा अंदाज पाहून अनेकांनी या नवरदेवाच्या कल्पकतेचं कौतुक केलं आहे.
पाहा व्हिडीओ
मुंबई लोकलमधून रोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. गर्दीत प्रवास करत घर ते ऑफिस अन् ऑफिस ते घर गाठत असतात. सध्याच्या काळात मुंबईकरांना प्रवासासाठी लोकलचा वापर करणं अत्यंत सुलभ आणि सोपं मानलं जातं. शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी मुंबईकर प्राधान्याने लोकल रेल्वेचा वापर करतात. परंतु, रेल्वेतून प्रवास करत असताना अनेक लोक डान्स, कला, रील्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शूट करणं पसंत करत असतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर chal_mumbai नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ही लग्नपत्रिका पाहून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “एकदम परफेक्ट मी पण असचं निमंत्रण देणार माझ्या लग्नात”