Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडीओ हे हसवणारे असतात तर काही व्हिडीओ रडवणारे असतात. नुकतीच वटपोर्णिमेचा सण पार पडला. याचपार्श्वभूमीवर एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हिंदू धर्मातील एक पवित्र आणि सश्रद्ध सण म्हणजे वटपौर्णिमा काल म्हणजेच १० जून रोजी साजरा झाला. नवविवाहित महिलांसाठी तर हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सात जन्मांसाठी त्याच्याशी नातं टिकावं यासाठी या दिवशी वटवृक्षाची पूजा आणि उपवास केला जातो. यावेळी वडाला धागा बांधून वडाभोवती सात फेरे घेतले जातात. अशीच वडाची पूजा करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या महिलेचा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वडाच्या झाडाभोवती महिला बसल्या आहेत आणि पूजा करत आहेत. वडाला धागा गुंडाळात आहेत. यावेळी एक महिला खाली बसून वडाची पूजा करत आहे आणि तिचा नवरा तिचे फोटो काढत आहे, मात्र यावेळी काही लहान मुलं फोटोच्या मधे मधे येऊन फोटो खराब करत आहेत. यावेळी ही महिला खूप रागवते आणि मुलांना ओरडते. ती म्हणतेय, “ए हो बाजुला माझ्या फोटोच्यामध्ये कोणी आलं ना तर फटकवेन हा” हे ऐकून महिलेचा नवराही हसू लागतो. फोटोसाठी हौशी असलेल्या महिलेचा व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ marathi_royal_karbhar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “बायका फोटोसाठी वेड्या असतात हे पुन्हा सिद्ध झालं”, तर दुसरा म्हणतो, “बापरे काय या बायका पूजा राहिली बाजुला फोटोच काढतात हल्ली या बायका जास्त” आणखी एकानं, आठवणींसाठी फोटो काढणं ठिक आहे मात्र पूजा सोडून फक्त फोटोंसाठी हे सगळं करुन फक्त फोटोस आणि व्हिडीओ चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.