Viral Video: गाडीतून प्रवास करताना मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणे हे काही भारतीयांसाठी नवीन नाही पण मर्यादेपेक्षा जास्त म्हणजे नेमकं किती? कधी मांडीवर बसून, हॅण्डलला लटकून असे जरी प्रवासी मोजले तरी १.. २ जास्तीत जास्त ५ अधिक प्रवासी घेऊन जाणं आपणही स्वीकारू शकतो. पण अलीकडेच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये मिनी कूपरमध्ये चक्क २७ जण बसल्याचे दिसत आहेत. या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करून घेण्यात आली असून स्वतः गिनीजच्या अधिकाऱ्यांना सुद्धा हे पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ट्विटरवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत खात्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये स्वयंसेवकांचा एक गट वाहनात फिरताना आणि दिसत आहे. “या नियमित आकाराच्या मिनी कूपरमध्ये किती माणसे बसू शकतात?” असे हे कॅप्शन असून जसा जसा व्हिडीओ पुढे सरकतो तुम्ही यात तब्बल २७ जण बसलेले पाहू शकाल.
६ सप्टेंबर रोजी पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ प्रत्यक्षात २०१४ चा आहे. हा विक्रम ८ वर्षांपूर्वी युनायटेड किंगडममध्ये शूट करण्यात आला होता. त्यानंतर, क्रूने रेकॉर्ड तयार करण्यासाठी विविध तंत्रांचा वापर केला. त्यांनी जागा ठरवल्या केल्या, एका व्यक्तीला दुसऱ्याच्या वर रचले आणि कारच्या मागील डब्यात लोकांना बसवले.
पहा अनोखा विक्रम
Video: कसली ग्रॅव्हिटी? महिला मंडळाने साडीत केलेला ‘हा’ खतरनाक डान्स पाहून बुचकळ्यात पडले नेटकरी
दरम्यान शेअर केल्यापासून हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. काही नेटकऱ्यांना हा अनोखा विक्रम अगदी हटके वाटला तर इतरांनी यावर टीका केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “दुर्घटनेत एखाद्याच्या डोक्यात लाथ बसेपर्यंत हे सर्व मजेशीर वाटते.” तर अनेकांनी हा वेळ वाया घालवण्याचा प्रकार असून याने काय साध्य होणार असेही सवाल केले आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.