scorecardresearch

Premium

Video: कसली ग्रॅव्हिटी? महिला मंडळाने साडीत केलेला ‘हा’ खतरनाक डान्स पाहून बुचकळ्यात पडले नेटकरी

Viral Video: नाचताना या महिलांना आजूबाजूच्या लोकांचं राहूद्या पण त्यांना चक्क गुरुत्वाकर्षणाचे सुद्धा भान राहिलेले नाही

Indian Aunty Dance Viral Video
Indian Aunty Dance Viral Video (फोटो: इंस्टाग्राम)

Viral Video: इंटरनेट हे मजेशीर व्हिडिओंचा खजिना आहे, तुमचे मनोरंजन करण्यात हे ऑनलाईन व्हायरल झालेले व्हिडीओ नेमकी चोख कामगिरी बजावतात. असाच एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे ज्यामध्ये महिलांचा खूप आनंदी आणि मजेदार डान्स दिसत आहे. ढोलकीच्या तालावर या महिलांनी असा काही ताल धरला आहे की आजूबाजूच्या लोकांचं राहूद्या पण त्यांना चक्क गुरुत्वाकर्षणाचे सुद्धा भान राहिलेले नाही. नेटकऱ्यांनी तर या व्हिडिओला झिरो ग्रॅव्हिटी डान्स असे नावही दिले आहे. काय आहे हा नेमका व्हिडीओ चला तर पाहुयात…

videonation.teb नावाच्या इंस्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला आजवर लाखो व्ह्यूज व लाईक्स आहेत. “आंटी १, ग्रॅविटी ०.” असा मजकूर व्हिडिओवर लिहिलेला दिसतो जो निश्चितच खरा आहे. साधारण आजूबाजूचा परिसर पाहता हा उत्तरेकडील राज्यातील व्हिडीओ असावा असा अंदाज आहे. यामध्ये काही महिला गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात नाचताना दिसत आहेत, तुम्ही स्वतःच बघून सांगा हा असा नृत्याविष्कार कधी तुम्ही पाहिलाय का?

OBC
ओबीसींचा खरा शत्रू कोण?
pregnant woman in Miraj taluka
सांगली : अडलेल्या महिलेसाठी वाटही अडली
Awareness Causes Treatment of Breast Cancer in Male in Marathi
Breast Cancer in Men :पुरुषांनाही होऊ शकतो स्तनाचा कर्करोग! प्रत्येक पुरुषाला माहीत हव्यात ‘या’ बाबी
Shani Maharaj Asta Till 9 March These Zodiac Signs To Be Free From Sadesati And Dhaiyya Effect Saturn Transit Bringing Huge Money
शनी देव झाले अस्त! ‘या’ राशींना साडेसाती व ढैय्यापासून मुक्ती, श्रीमंतीचा मार्ग होईल खुला, नशीबही पालटणार

Video: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ महिला; इतक्यात एक चिमुकला आला अन..पाहा थरकाप उडवणारा क्षण

झिरो ग्रॅविटी डान्स

इतक्या बेभान व बेधूंद होऊन नाचणाऱ्या महिलांच्या आत्मविश्वाससचे कौतुक करताना नेटकर्त्यांना शब्दच कमी पडत आहेत पण त्याहीपेक्षा जास्त कौतुकांचा वर्षाव या महिलांच्या भन्नाट स्टेप्स वर होत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त स्टेप्स नाही बरं तर या महिला हावभावांच्या बाबतही एकदम सरस आहेत. तुम्ही कमेंट बॉक्स पाहिल्यास पोट धरून हसाल, एकाने न्यूटन सुद्धा या महिलांसमोर फिका पडेल असे म्हंटले आहे तर एकाने वो स्त्री है कूच भी कर सक्ती है अशा मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video indian aunty dance makes netizen forget the concept of gravity see funny moves svs

First published on: 10-09-2022 at 16:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×