मुंबईत धुलिवंदनाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. ठिकठिकाणी लोकं रंगांची उधळण करत होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण एकत्र येत धुलिवंदनाचा आनंद घेत होते. सोशल मिडीयावर देखील यासंदर्भात अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या. अशातच मुंबई लोकलमधील एक व्हिडिओ समोर आला आहे जो नेटकऱ्यांचे मन जिंकत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रेनमध्ये भरपूर गर्दी दिसत आहे. यामधील काही पुरुष मंडळी गाणं गाताना दिसत आहेत. यामधील काहीजणांनी चेहऱ्यावर कलर देखील लावलेला आहे. ही पुरुष मंडळी एकमेकांच्या सुरात सूर मिसळून तल्लीन होत गाणं गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकाऱ्यांचे मन जिंकत आहे.

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: रस्त्यावर पडलेले पैसे उचलणे ‘या’ व्यक्तीला पडले महागात; Viral Video पाहून तुम्हालाही धक्का बसेल)

हा व्हायरल व्हीडिओ @Chilled_Yogi या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. खरं तर हा व्हिडिओ ४ मार्चला शेअर करण्यात आला होता. जो धुलीवंदनाच्या निमित्ताने व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोकं अनेक कंमेंट देखील करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of dhulivandan in mumbai local goes viral on social media gps