Sachin Tendulkar 50th Birthday Video: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. यासाठी सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांच्यासह काही जवळचे नातेवाईक गोव्यात पोहोचले आहेत. कडेकोट बंदोबस्तात सचिनही गोव्यात पोहोचला आहे. सोमवारी ते गोव्यात वाढदिवस साजरा करणार आहेत. दुसरीकडे चाहत्यांनी लाडक्या सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे. त्याच्या जवळच्या मित्रांनी तसेच राजकीय मंडळींनी सुद्धा सचिनसाठी खास पोस्ट लिहिली आहे. या सगळ्यामध्ये एका व्यक्तीच्या शुभेच्छा मात्र फारच भन्नाट ठरल्या आहेत, ती व्यक्ती म्हणजे वीरेंद्र सेहवाग.
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सचिन तेंडुलकरला त्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी एक भन्नाट पोस्ट लिहिली आहे. तुम्ही बघू शकता की, या फोटोमध्ये सेहवाग चक्क उलटा होऊन शीर्षासन करत आहे, बरं हाच प्रकार काय कमी भन्नाट होता म्हणून त्याने वर पोस्टला कॅप्शनही कमाल दिले आहे. सेहवाग सचिनला म्हणतो की, “तू मला मैदानात जे काही सांगितलंस, मी त्याचं नेहमी उलटच करत आलो आहे, त्यामुळे तुझ्या ५० व्या वाढदिवसाला तुला शीर्षासन करूनच शुभेच्छा देतोय, ‘पाजी आप, जिओ हजारों साल…साल के दिन हो एक कोटी'”
Video: सचिनला वीरूच्या जबरदस्त शुभेच्छा
हे ही वाचा<< सचिन तेंडुलकरच्या खऱ्या फॅनलाच माहीत असतील ‘या’ १० दुर्मिळ गोष्टी; क्रिकेटच्या देवाचे किस्से वाचून व्हाल थक्क
दरम्यान, सचिन तेंडुलकर आपल्या खास दिवसाचा आनंद आपल्या कुटुंबीयांसह आणि नातेवाईकांसह घेणार आहे. सचिन तेंडुलकरची बर्थडे पार्टी गोव्यात आहे, त्यासाठी तो पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकसह गोव्यात पोहोचला आहे. तर मुंबईत शनिवारी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात रोमांचक सामना झाला. या सामन्यासाटी सचिनही उपस्थित होता. त्याने मुंबई आणि पंजाब संघाच्या सामन्यानंतर आपला वाढदिवस साजरा केला.