Woman Gesture Of Calling Delivery Boy By His Name : न थकता, न थांबता आपण दिवसरात्र काम करत असतो. काही जण एसीमध्ये बसून तर अनेक जण उन्हातान्हात भटकून त्यांच्या महिन्याचा पगार न कापता हातात यावा म्हणून मेहनत घेत असतात, त्यामुळे या बदल्यात कितीही छोटे असले तरीही काम पूर्ण झाले म्हणून नाही तर त्यासाठी प्रयत्न केला म्हणून कौतुकाचे दोन शब्द आपल्या कानी पाडावेत एवढीच इच्छा आपल्या सगळ्यांची असते; तर आज अशीच एका घटना सोशल मीडियावर घडली आहे. दिल्लीतील एका महिलेने डिलिव्हरी बॉयच्या कामासाठी म्हटलेले शब्द त्याच्यासाठी आनंदाचा क्षण ठरला आहे.
दिल्लीतील एका महिलेने झोमॅटो डिलिव्हरी ड्रायव्हरशी झालेल्या तिच्या संवादाची आठवण करून देणारे ट्विट शेअर केले. एका व्यक्तीच्या नावाचे महत्त्व काय असते हे त्यादिवशी तिला समजले. तर @neha_basic एक्स युजरने झोमॅटोवरून काहीतरी मागवले होते. त्यानंतर पार्सल देण्यासाठी अर्जुन नावाचा डिलिव्हरी बॉय ११ व्या मजल्यावर आला. पार्सल हातात आल्यावर तिने फक्त “धन्यवाद, अर्जुन!” एवढाच शब्द म्हटला आणि डिलिव्हरी बॉयच्या चेहऱ्यावर एक मस्त स्माईल आली.
त्यामुळे हा सुंदर क्षण आपल्या पोस्टद्वारे शेअर करत तिने “आपल्याला माहिती नसतं की, तो आपल्या आयुष्यात कोणत्या अडचणीत आहे किंवा त्याचा दिवस कसा गेला आहे. पण, आपण नकळत केलेल्या अशा छोट्या छोट्या गोष्टी एखाद्याचा दिवस आनंदी करू शकतात”; अशी कॅप्शन दिली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @neha_basic या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे; याबद्दल नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत.
पोस्ट नक्की बघा…
काय म्हणत आहेत युजर्स?
पोस्ट पाहून “पण कधीकधी चांगलं वागल्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. माझी एक मैत्रीण नेहमीच नम्रपणे थँक यू म्हणायची. काल डिलिव्हरी करणाऱ्याने तिला तिचा इन्स्टाग्राम आयडी विचारण्यासाठी परत फोन केला आणि नंतर तिला विचित्र गोष्टी सांगू लागला.” “उन्हाळ्यात पार्सल देणाऱ्या डिलिव्हरी बॉयला देण्यासाठी मी फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या ठेवायचो ”, “हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएंस पीपल” या पुस्तकात मी एक सुंदर गोष्ट वाचली आहे की, “कोणाचं नाव प्रेमाने घेणं ही त्यांच्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट असते”; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसून आले आहेत.