Viral Video: हल्लीचे तरुण-तरुणी गाडी चालविताना रील्स करणे, डान्स करणे, जीवघेणे स्टंट करणे, इतर गाड्यांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक चित्र-विचित्र गोष्टी करताना दिसतात. पण, अनेकदा या हलगर्जीपणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. असे अनेक व्हिडीओ आजपर्यंत आपण पाहिले आहेत. दरम्यान, आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यामध्ये एक तरुण हायवेवर जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काहीतरी व्हायरल होतच असते. अनेकदा त्यावर अपघातांचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. जे समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. नुकताच असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एक तरुण बाईकवरून जीवघेणा स्टंट करतोय. त्याशिवाय यावेळी त्याच्या बाईकवर एक लहान मुलगादेखील पुढे बसलेला दिसत आहे. पण, पुढे अचानक असं काहीतरी होतं, जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

नक्की काय घडले व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण हायवेवर बाईकवरून जात असताना तो मधेच बाईक चालवता चालवता उभा राहतो आणि पुन्हा बाईकवर बसतो. अशा प्रकारे तो विविध स्टंट करीत आहे. यावेळी त्याच्या बाईकवर एक लहान मुलागादेखील बसलेला दिसत आहे. त्याशिवाय पुढे गेल्यावर अचानक एक बैल बाईकसमोर येतो. यावेळी तो तरुण बैलाच्या बाजूने कट मारून जातो. या तरुणाचा हा जीवघेणा स्टंट पाहून नेटकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ उत्तर प्रदेश येथील सीतापूर येथील असून, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, तो X (ट्विटर)वरील @Gyanendra Shukla या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याशिवाय या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ५१ हजारांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक नेटकरीदेखील यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘छोटीशी रखुमाई…’आषाढी एकादशीनिमित्त चिमुकलीचा खास लूक VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

नेटकऱ्यांच्या कमेंट्स चर्चेत

यावर एका नेटकऱ्याने लिहिलेय, “असं वाटतंय की, याला आयुष्यात पहिल्यांदा बाईक मिळाली आहे.” आणखी एकाने लिहिलेय, “याचा कायमचा सोक्षमोक्ष लावायला हवा.” आणखी एकाने लिहिलेय, “किती निर्लज्ज आणि मूर्ख माणूस आहे. स्वतःसोबत लहान मुलाचा जीवपण धोक्यात घालत आहे हा.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजकालच्या लोकांमध्ये मूर्खपणा भरलेला आहे.”

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यात काही तरुण चालू कारमध्ये रील बनवत होते. त्यामुळे अचानक त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. तर आणखी एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका तरुणीने स्कुटीवरून जाताना हत्तीला धक्का दिला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video a young man was doing a stunt on a bike suddenly a bull appeared after watching this video you users also shock sap