Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध गोष्टींचा ट्रेंड सुरू असतो. मग ती गाणी असो किंवा एखाद्या डान्सचा व्हिडीओ याबाबत सतत विविध गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेली गाणी, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनविताना दिसतात. मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’ हे मराठमोळे गाणे तुफान चर्चेत आहे. या गाण्यावर लोकांनी लाखो रील्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. दरम्यान, आता सध्या सोशल मीडियावर ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सुसेकी’ गाणं खूप चर्चेत आहे; ज्यावरील अनेक व्हिडीओदेखील व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर रील्स बनविणाऱ्यांमध्ये काही लोक असे आहेत; जे पूर्ण वेळ रील्स, व्हिडीओ बनवून लोकांचे मनोरंजन करीत असतात. पण, काही लोक असेदेखील आहेत की, जे आपली नोकरी, व्यवसाय करीत रील्स बनविण्याची हौस पूर्ण करतात. आपण आतापर्यंत रील्स बनविणाऱ्यांमध्ये बस कंडक्टर, पोलीस, शिक्षक आदींना आपण कामाच्या ठिकाणीदेखील रील्स बनविताना पाहिले आहे. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन पेंटर घराला रंग देता देता रील्स बनविताना दिसत आहेत. त्याशिवाय त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या सुसेकी गाण्यावर रील बनविल्याचे दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन पेंटर एका घराचे रंगकाम करीत असताना सुसेकी गाण्यावर रील बनवीत आहेत. यावेळी ते दोघेही खूप हटके डान्स करताना दिसत आहेत. या दोघांचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @creative_paint_by_g1 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्ये, पुष्पा पेंटर, असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत सात दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तर, अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: शक्ती आणि युक्तीचा खेळ! प्राण्याची शिकार करण्यासाठी वाऱ्याच्या वेगाने धावला चित्ता अन् पुढे जे घडलं… VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये एका युजरने लिहिलंय, “भावा, तू या ट्रेंडचा सर्वांत हिट डान्सर.” तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “याला बोलतात काम करताना कोणतंही टेन्शन न घेता, एन्जॉय करणं.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “पक्का कॅमेरामन मिस्री असेल.” चौथ्या युजरनं लिहिलंय, “सुपर डान्सर” दरम्यान, यापूर्वीही अनेकांनी या गाण्यावर डान्स केले आहेत. हे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video after watching the video of the amazing dance on the song angaron ka amber sa netizens said painter pushpa sap