Airlines attendant Help elderly passenger : बस, ट्रेन यापेक्षा विमानाचा प्रवास थोडा खास असतो. विमान प्रवासात अनेक सोई-सुविधा मिळतात; परंतु थोडा जास्त खर्च येतो. असे असले तरी प्रवाशांना उंचावर जाऊन जग पाहण्याची एक वेगळीच संधी मिळते. त्यामुळे हा प्रवास करण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. पण, प्रवास करणारे काही जण थोडे चिंताग्रस्त सुद्धा असतात. आपल्याला एकटं प्रवास करायला जमेल का, विमानात नीट वागणूक मिळेल का आदी अनेक गोष्टी मनात सुरुच असतात. तर आज सोशल मीडियावर असेच काहीसे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
सौदी एअरलाइन्सएच्या एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.यामध्ये प्रवासादरम्यान विमानात वृद्ध प्रवासी प्रवास करीत होता. त्याला विमानप्रवासादरम्यान मदत व्हावी म्हणून फ्लाइट अटेंडंटने त्याला जेवण भरवायला सुरुवात केली. केबिन क्रू मेंबरने त्या वृद्ध व्यक्तीला चमच्याने जेवण दिले. यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही चिडचिड नव्हती. तो अगदी नम्रपणे त्या वृद्ध व्यक्तीला जेवू घालताना दिसला आहे.
माणुसकी अजूनही जिवंत आहे (Viral Video)
विमान प्रवासात अनेक गोष्टी कळत नसल्यामुळे वारंवार तेथील केबिन क्रू मेंबरना विचारावे लागते, त्यांची मदत घ्यावी लागते. त्यामुळे ही माणसे सुद्धा कशाचीही पर्वा न करता, वेगवेगळ्या देशातून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित आणि सन्मानीय वातावरण तयार करण्यात नेहमी सक्षम असतात. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, विमान कर्मचाऱ्याच्या शांत स्वभावामुळे आणि स्थिर हावभावांमुळे असे दिसून आले की, प्रवाशाला घाई करण्याऐवजी आधार मिळावा अशी त्याची इच्छा होती.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @saudia_aviation या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “वृद्ध प्रवाशाला पाठिंबा मिळाला”, “अशा कृतीने विमानातील प्रत्येकासाठी विमान प्रवासाचा अनुभव आणखीन खास झाला”, “एअरलाइन कर्मचारी ज्येष्ठांशी इतका आदराने वागतात हे पाहून आनंद झाला”, “अशा छोट्या कृती आपल्याला आठवण करून देतात की माणुसकी अजूनही दररोजच्या जागांमध्ये अस्तित्वात आहे”, “असा दयाळूपणा दाखवला की, प्रवास सुरक्षित वाटू लागतो” तर इतरांनी अशी आशा व्यक्त केली की “हॉस्पिटलमधील कर्मचारी या कृतीतून प्रेरणा घेतील.
