Viral Video: महिलांचा आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशीच एक महिला जबरदस्त डान्स करताना दिसतेय.
सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये “झूम झूम बाजे रे पैजनिया” या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. महिलेचा डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल. सध्या तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sangeeta_mishra05 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या असून यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “काकू खरंच तुम्ही हिरोईनपेक्षा भारी नाचता. तर दुसऱ्याने लिहिलंय की, “आंटी कुठेही सुरू होतात. ”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “काकू तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.”