Viral Video Family organize Pet Dog Baby Shower : माणसांचे प्राण्यांवर असणारे प्रेम आपण वेगवेगळ्या रूपात पहिले आहे. एकवेळ प्राण्यांवर प्रेम करू पण माणसांवर नाही; असे म्हणणारे प्राणीप्रेमी त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी इवलसं घर बनवतात, त्यांना छान-छान कपडे तर खायला चमचमीत गोष्टी सुद्धा देतात. पण, आज सोशल मीडियावर एक आगळावेगळा व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये मालकाने येणाऱ्या पिल्लासाठी डोहाळेजेवणाला हळदीसारखा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते; जे पाहून तुम्हीही नक्कीच भारावून जाल…
लग्न समारंभाची सुरुवात पारंपारिक भारतीय हळदी विधीपासूनच केली जाते. पण, यावेळी हा हळदीचा सुंदर कार्यक्रम नवरा-नवरीसाठी नाही तर श्वानाच्या आईसाठी होता. तर या खास प्रसंगासाठी श्वान आईसाठी सुंदर कपडे सुद्धा तयार करून घेतले होते. केळीच्या पानाचे डेकोरेशन करून पिवळ्या आणि केशरी रंगाच्या झेंडूच्या फुलांनी सजावट केली होती आणि दागिने आणि गजऱ्याच्या फुलांचे दागिने सुद्धा श्वान आईला घातले होते; जेणेकरून ती कार्यक्रमात सुंदर दिसावी.
“असं डोहाळेजवण तुम्ही कधीच पाहिलं नसेल” (Viral Video)
पाळीव प्राण्यांचे पालक त्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करतात. पण, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत कुटुंबातील सदस्यांनी मिळून डोहाळेजेवणाला हळदीसारखा कार्यक्रम आयोजित केला आहे; ज्यामध्ये पाळीव प्राण्याच्या त्वचेला त्रास होऊ नये म्हणून अगदी थोडीशीच हळद त्यांनी श्वान आईला लावलेली दिसत आहे. त्यानंतर त्यांनी औक्षण करून श्वान आईसाठी तयार करून घेतलेला फ्रॉक सुद्धा घातला. त्यानंतर फ्रॉकवर उठून दिसतील असे दागिने आणि गजऱ्यांच्या माळा सुद्धा त्यांनी अगदी सुंदरपणे पाळीव श्वानाला घातलेल्या दिसत आहेत.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @inkofjithin या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “खूप सुंदर, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगून जातो आहे”, “असं डोहाळेजेवणाला तुम्ही कधीच पाहिलं नसेल” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत. तर अशा प्रसंगांमधून एक बदल दिसून आला आहे तो म्हणजे पाळीव प्राणी हे फक्त शोभेची वस्तू नाही तर कुटुंबाचा अविभाज्य भाग असतात. आपल्या कठीण दिवसांत आधार देतात, आपण घरात पाऊल टाकताच उत्साह दाखवतात आणि आपल्यावर मनापासून प्रेम करतात.
