Viral Video: जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप सावध राहावे लागते. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. सिंह आणि मगरीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एका तहानलेल्या सिहावर मगर हल्ला करण्यासाठी आल्याचे दिसत आहे.

सिंह जंगलाचा राजा असला तरी मगर सुद्धा काही कमी नाही. ज्याप्रमाणे संपूर्ण जंगलावर सिंहाचे वर्चस्व असते. त्याप्रमाणे तळ्यावर मगरीचे वर्चस्व असते. जंगलातील प्राणी तळ्यावर पाणी प्यायला गेल्यावर सतर्क असतात. कारण, मगर कधी पाण्यातून अचानक येऊन शिकार करेल हे सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार आता समोर आलाय ज्यात मगरीने चक्क सिंहाबरोबर पंगा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलातील तळ्यात सिंह पाणी पिण्यासाठी गेला असून यावेळी तो पाण्यात उतरतो. सिंह पाण्यात उतरल्याचे दिसताच शिकार करण्यासाठी आतुर असलेली मगर त्याचा पाठलाग करते आणि सिंह तळ्याच्या मधोमध गेल्याचे दिसताच त्याच्यावर हल्ला करते. मगरीने मोठ्या हुशारीने केलेली सिंहाची शिकार पाहून नेटकरीही शॉक झाले आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ युट्यूबवरील @Latestsightings या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप भयानक! मी कल्पनाही करू शकत नाही.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “मगर खूपच धुर्त आहे.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहून धक्का बसला.” चौथ्या युजरने लिहिलेय, “सिंहाचा काळ संपला”