groom and bride shocking entry video : सध्या सर्वत्र लग्नसराईचे वातावरण आहे. लग्न म्हणजे वधू-वराच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. त्यामुळे दागदागिने, कपडे, चप्पल, मेकअप अशी सगळ्याचीच खरेदी करावी लागते. त्यातच आता ट्रेंड म्हणा किंवा आवड आपल्यातील सगळेच जण हटके एंट्री करूनच स्टेजवर जातात. ही हटके एंट्री डान्स नेहमीच डान्स करून किंवा एखाद्या पालखीत बसून नवरा-नवरीची एंट्री होते. पण, आज सोशल मीडियावरी नवरा-नवरीची एंट्री पाहून तुम्ही सगळेच काही क्षणांसाठी घाबरून जाल.

लग्नात एंट्रीसाठी नवनवीन युक्त्या शोधून काढल्या जात आहे. तर या व्हिडीओत सजावट करणारा प्रथम नवरा आणि नवरीच्या एंट्रीसाठी जमिनीवर पांढरे एअर बलून पसरवतो; ज्यामुळे सगळ्यांचाच गैरसमज होतो. कारण जमिनीवर पडलेले पांढऱ्या एअर बलून मेलेल्या माणसाच्या बॉडी हॉस्पिटलमध्ये ठेवल्या जातात अगदी त्याचप्रमाणे दिसत असतात; जे पाहून तुम्ही काही सेकेंदासाठी थक्क व्हाल आणि हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघण्याची हिम्मत कराल एवढे तर नक्की…

एंट्री बघून सगळेच शॉक (Viral Video)

पण, व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, जेव्हा या फुग्यांमध्ये हवा भरली जाते तेव्हा हे फुगे हळूहळू जमिनीवरून वर येताच आणि एखाद्या खास सजावटीमध्ये त्याचे रूपांतर होते. पांढरे फुगे वर येतात आत दिवे चमकू लागतात आणि नवरा-नवरीची जबरदस्त एंट्री होते. अंदाजे २९ सेकंदांच्या या फुटेजचा शेवट या क्षणाने होतो; ज्यामुळे सगळ्यांचा गैरसमज दूर होतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ghantaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून आमचाही गैरसमज झाला असे सांगत “अरे बापरे! हे पाहून मी फारच घाबरले! मला खरंच वाटलं की, कुणीतरी त्यांच्या लग्नातच देवाघरी गेलं आहे. पण, शेवट बघून मला स्वतःलाच हसू आवरत नाही आहे”, “अरे बापरे मलाही तसंच काहीतरी वाटलं. लग्न करायचं असेल तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल”, “मी आरआयपी लिहिणार होतो; पण व्हिडीओचा शेवट बघून अभिनंदन लिहिलं” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.