Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच काही ना काहीतरी व्हायरल होतच असतं. अनेकदा त्यावर रोडवरील गाड्यांच्या अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. हल्लीचे तरुण-तरुणी गाडी चालवताना रिल्स काढणे, डान्स करणे, जीवघेणे स्टंट करणे, इतर गाड्यांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक गोष्टी करताना दिसतात. पण, अनेकदा या हलगर्जीपणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. अशा अपघातांमध्ये स्कुटी, बाईक चालवणाऱ्या तरुणींचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात; ज्यात बऱ्याचदा तोल न सावरता आल्यामुळे किंवा रिल्स बनवण्याच्या नादात त्यांचा अपघात होतो. असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीदेखील चकित व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरुणी, स्कुटी आणि अपघात हे समीकरण नवीन नाही. बऱ्याचदा स्कुटी चालवणाऱ्या तरुणींचे छोटे-मोठे अपघात होताना आपण पाहतो. त्यांचे हे अपघात पाहून युजर्सही अनेक कमेंट्स करताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रस्त्यावरील सिग्नलवर काही गाड्या आधीपासूनच उभ्या होत्या, त्यावेळी अचानक एका स्कुटीवरून तरुणी येते आणि गाडी सिग्नल असल्याने थांबवते; पण इतक्यात तिचा तोल जातो आणि ती सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या गटरात पडते. त्या तरुणीला पडलेले पाहून सिग्नलवरील लोक धावत येतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @akashchauhan_70 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तसेच यावर साठ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर युजर्सदेखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “घाबरू नका मित्रांनो, पाणी चेक करण्यासाठी गेली आहे”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “यांना कितीही चांगले रस्ते द्या, या गटरातच पडणार”, तर तिसऱ्या एकाने लिहिलंय की, “पप्पांच्या पऱ्या नसत्या तर काय झालं असतं आपलं”; तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “पापा की परी गटर में गिर पडी.”

हेही वाचा: आरारा खतरनाक! गुलाबी साडी गाण्यावर पुरुष मंडळींचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, ‘काका तुम्ही कडक…’

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, याआधीदेखील असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये तरुणी गाडी चालवताना पडलेल्या दिसल्या होत्या. एका तरुणीने तर चक्क गाडी चालवताना हत्तीला धडक दिली होती, तर एक तरुणी गाडीसकट घराच्या कौलांमध्ये अडकलेली दिसली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video girl came with a scooty and fell straight into the drain after seeing the video users comments sap