Granddaughter Dancing With Grandparents Viral Video : नातवाचे पहिले मित्र हे आजी आजोबाच असतात. आजी-आजोबांबरोबर गप्पा, त्यांच्या काळातील चित्रपटातील गाणी, पौराणिक गोष्टी त्यांच्याकडून ऐकण्यात एक वेगळीच मजा असते. त्याचप्रमाणे घरातील नातवंडांचे लाड आणि हट्ट आजी आजोबांकडून पुरवले जातात. त्यामुळे हे जगातील सर्वातभारी नातं आहे. आई-वडिलांपेक्षाही चांगली गट्टी आजी-आजोबा आणि नातवंडांची जमते. तर आज या खास नात्याची झलक व्हायरल व्हिडीओत बघायला मिळाली आहे; जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.
कॅनडामध्ये राहणारी कंटेंट क्रिएटर शेफाली या महिन्यात भारतात तिच्या आजी-आजोबांना भेटायला आली होती. यादरम्यान तिने डान्स व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला. शेफालीने सांगितल्याप्रमाणे तिचे आजोबा (आजोबा) हृदयरोगी आहेत आणि त्यांच्या हृदयाच्या आतमध्ये पेसमेकर बसवले जाते.ते नेहमीच खूप ॲक्टिव्ह असायचे. त्यामुळे त्यांना असे पाहून तिला खरोखर वाईट वाटले. अगदी हलक्या व्यायामामुळेही त्यांच्या छातीत दुखते आणि त्यांची हालचाल, ऊर्जा सुद्धा अगदी आता मर्यादित झाली आहे.
पण, आजोबांची अशी परिस्तिथी असूनही नातीबरोबर त्यांनी डान्स करण्यास उत्साह दाखवला. डान्स करण्याआधी नातीने आजी-आजोबांना जमेल का याची खात्री सुद्धा करून घेतली. त्यानंतर मग तिघांनी मिळून हिमेश रेशमियाच्या फिर हेरा फेरीमधील ‘ऐ मेरी ज़ोहराजबीं’ या गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात केली. स्वयंपाकघरातील काही भांडी घेऊन त्यांनी अक्षय कुमार, परेश रावल यांच्यासारख्या हुबेहूब स्टेप्स करण्याचा प्रयत्न केला आहे; जो बघायला खूपच सुंदर दिसतो आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @journeywithshefali या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “डान्स करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह पाहून मजा आली. तुमच्या आजी-आजोबाबांबरोबर नाचा. कितीही मजेशीर वाटलं तरीही हा व्हिडीओ कायमचा जपून ठेवा”; अशी कॅप्शन तिने व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी “मला माझ्या आजोबांची आठवण आली”, “आजी-आजोबा आपल्याबरोबर असणे नेहमीच एक आशीर्वाद असतो”, “या व्हिडीओने मला स्क्रोल करताना थांबायला भाग पाडलं” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.